सात हिजबुल अतिरेक्यांची सव्वाकोटीची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 07:06 AM2019-03-20T07:06:55+5:302019-03-20T07:07:20+5:30
पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘हिजबुल मुजाहिदीन’ या अतिरेकी संघटनेच्या सात दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील १३ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालयानालयाने (ईडी) मंगळवारी टांच आणली.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ‘हिजबुल मुजाहिदीन’ या अतिरेकी संघटनेच्या सात दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील १३ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालयानालयाने (ईडी) मंगळवारी टांच आणली.
काश्मीरमधील दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाºया आर्थिक साह्याच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ‘हिजबुल’चा पाकिस्तानात राहणारा प्रमुख सैयद सलाहुद्दीन व इतरांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने ‘ईडी’ने ‘मनी लॉन्ड्रिंग’ कायद्यान्वये ही जप्तीची कारवाई केली. या मालमत्तांचे कागदोपत्री मूल्य सुमारे १.२२ कोटी रुपये आहे. ज्यांच्या मालमत्तांवर जप्ती आली आहे, त्यांत मोहम्मद शफी शाह याच्याखेरीज अन्य सहा हिजबुल दहशतवाद्यांचा समावेश आहे.
हिजबुल मुजाहिदीन ही काश्मीरमधील दहशतवादात सर्वाधिक सक्रिय आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे बसलेला सैयद सलाहुद्दीन हा स्वघोषित ‘कमांडर’ हिजबुलची सूत्रे हलवित असतो.
कुठे जातो हा पैसा?
‘ईडी’ म्हणते की, दहशतवादी कारवायांसाठीचा हिजबुलचा हा पैसा हवाला, वस्तुविनिमय व हस्तकांच्या हस्ते भारतात पाठविला जातो. हिजबुलच्या काश्मीरमधील मृत वा सक्रिय दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना हा पैसा वाटला जातो.