जेटलींंसह सात मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी, १८ जणांबाबत निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:51 AM2018-03-08T01:51:17+5:302018-03-08T01:51:17+5:30
सात केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस यांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिली आहे. अठरा उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यसभेच्या २६ ते २७ जागा भाजपा जिंकू शकेल. दोन दिवसांत इतर नावे जाहीर केली जातील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली - सात केंद्रीय मंत्री व पक्षाचे सरचिटणीस यांना भाजपने राज्यसभेची पुन्हा उमेदवारी दिली आहे. अठरा उमेदवारांबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. राज्यसभेच्या २६ ते २७ जागा भाजपा जिंकू शकेल. दोन दिवसांत इतर नावे जाहीर केली जातील. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे.
अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गहलोत या केंद्रीय मंत्र्यांना तसेच पुरुषोत्तम रुपाला व मनसुख मांडवीय या दोन राज्यमंत्र्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. भूपेंद्र यादव राजस्थानमधून निवडणूक लढवतील. केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, हे वृत्त लोकमतने २५ फेब्रुवारी रोजीच दिले होते. जेटली यांना गुजरातऐवजी उत्तर प्रदेशातून तर धर्मेंद्र प्रधान यांना बिहारऐवजी मध्य प्रदेशमधून रिंगणात उतरवले आहे. रविशंकर प्रसाद बिहारमधून व थावरचंद गहलोत यांना मध्य प्रदेशमधूनच उमेदवारी मिळाली आहे. जे. पी. नड्डा हिमाचल प्रदेशातूनच रिंगणात असतील.
समाजवादी पक्षातर्फे जया बच्चन
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या राज्यसभेच्या जागेसाठी समाजवादी पक्षातर्फे जया बच्चन यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे सपाचे नरेश अग्रवाल यांना संसदेत परतण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. बच्चन यांना पक्षाने तिसºयांदा उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि जया बच्चन यांची निकटता हा मध्यंतरी चर्चेचा विषय होता. तृणमूलने जया बच्चनना प.बंगालमधून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती.
यांच्याबाबत अद्याप निर्णय नाही
उमेदवारांच्या नावांची एकाच वेळी घोषणा करण्याचे भाजपा टाळत आहे. सरचिटणीस राम माधव, मुरलीधर राव, अरुण सिंग, अनिल जैन आदींना उमेदवारी द्यायची की नाही, याचा भाजपाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.