RBI गव्हर्नरपदासाठी सात नावे चर्चेत
By admin | Published: June 19, 2016 08:35 AM2016-06-19T08:35:20+5:302016-06-19T08:38:25+5:30
रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याजागी कोण येणार याची आता चर्चा सुरु झाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याजागी कोण येणार याची आता चर्चा सुरु झाली आहे. आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी एकूण सात उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.
विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांचा आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी विचार होऊ शकतो. उर्जित पटेल सध्या आरबीआयचे उप गर्व्हनर म्हणून जबाबदारी संभाळत आहेत तसेच अरुंधती भट्टाचार्य देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत.
केंद्रीय अर्थमंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकारी शक्तीकांत दास आणि अरविंद सुब्रमण्यम आरबीआय गर्व्हनरपदाच्या शर्यतीत नसल्याची माहिती आहे. रघुराम राजन यांनी शनिवारी आरबीआय कर्मचा-यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये आपल्याला पुन्हा आरबीआयचे गर्व्हनरपद भूषवण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला संपत आहे. त्यानंतर ते शैक्षणिक कार्याकडे वळणार आहेत.