उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा बालमृत्यू, बीआरडी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 08:29 PM2017-08-29T20:29:28+5:302017-08-29T20:31:41+5:30

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज कॉलेज (बीआरडी) हॉस्पिटलमध्ये 48 तासांत सात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यमुळे आणि सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Seven people die in Balmutru, BRD hospital again in Uttar Pradesh | उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा बालमृत्यू, बीआरडी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा बालमृत्यू, बीआरडी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू

Next

गोरखपूर, दि. 29 - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज कॉलेज (बीआरडी) हॉस्पिटलमध्ये गेल्या 48 तासांमध्ये सात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यमुळे आणि सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 105 बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आसतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी बीआरडी हॉस्पिटलचे माजी प्रिंसिपल राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा यांना आज कानपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर टीका केली आहे. 'संवेदनाशून्य आणि अपयशी सरकार' असल्याचा आरोप केला जात आहे.

ऑस्टरच्या दुसºया आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत १0५ झाली. हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला होता.

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारकडे बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले आहे. ऑक्सिजनअभावी मुलांचा मृत्यू झाल्याची बाब योगी सरकारनं फेटाळून लावली आहे. त्यामुळे बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यूमागे नेमके कारण काय आहे?, यावर अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अलाहाबाद हायकोर्टात याप्रकरणी 29 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे बालमृत्यूप्रकरणी लखनौमधील कोर्टात याप्रकरणी खटल्यासाठी अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे. तक्रार करण्यात आलेल्या या अर्जात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्सचे संचालक मनिष भांडारी आणि ऑफिस हेड मिनू वालिया यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Seven people die in Balmutru, BRD hospital again in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.