१ जिल्हा, २४ तास अन् ७ आत्महत्या; सर्व आत्महत्यांमध्ये एक समान धागा; पोलीसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:06 PM2021-03-30T19:06:59+5:302021-03-30T19:08:23+5:30
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये विविध वयोगटांमधल्या व्यक्तींचा समावेश; पोलिसांकडून तपास सुरू
नोएडा: दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातल्या नोएडा जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये एका सॉफ्टवेअर अभियंत्याचादेखील समावेश आहे. या घटनांमुळे पोलिसांना धक्का बसला आहे. पोलिसांनी सगळ्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. सात आत्महत्यांपैकी बऱ्याचशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी ताण तणावाची शक्यता वर्तवली आहे. तशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-३९ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अजनारा हेरिटेज सोसायटीत वास्तव्यास असलेले सॉफ्टवेअर अभियंता तबरेज खान (वय ४५ वर्षे) मंगळवारी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. पंख्याला गळफास लावून त्यांनी जीवन संपवलं. खान गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक प्रकल्प नाकारला गेला होता. त्यामुळे त्यांना नैराश्य आलं होतं.
भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEO
एल्डिको आमंत्रण सोसायटीत तरुणीची आत्महत्या
सेक्टर ११९ मध्ये असलेल्या एल्डिको आमंत्रण सोसायटीत राहात असलेल्या २० वर्षीय तरुणीनंदेखील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पार्थवी चंद्रा असं तिचं आवाज होतं. पार्थवीला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वाजिदपूर महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
वाजिदपूर गावात राहणाऱ्या गीता देवी (वय ४० वर्षे) यांनी सोमवारी रात्री पंख्याला गळफास लावून जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.
दादरी क्षेत्रातल्या लोहारलीमध्ये तरुणाची आत्महत्या
दादरी परिसरातल्या लोहारली गावात राहत असलेल्या भीम (वय २८ वर्ष) यांनीदेखील आत्महत्या केला. तर सेक्टर ४९ मधील बरौला गावात राहणाऱ्या धर्मेंद्र (वय ४० वर्ष) यांनी मानसिक तणावाला कंटाळून पंख्याला गळफास लावून जीवन प्रवास संपवला.
सेक्टर ४९ मध्ये तणावाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-२० मध्ये प्रकाश हलदर (वय ३० वर्ष) या तरुणानंदेखील आत्महत्या केली. पंख्याला लटकून त्यानं स्वत:ला संपवलं. तर सेक्टर ४९ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीनं नैराश्याला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं.