माजी खासदार सोळंकीसह सात जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:02 AM2019-07-12T05:02:59+5:302019-07-12T05:03:03+5:30

आरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण

Seven persons, including former MP Solanki, have been given life imprisonment | माजी खासदार सोळंकीसह सात जणांना जन्मठेप

माजी खासदार सोळंकीसह सात जणांना जन्मठेप

Next

अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिनू बोघा सोळंकी आणि सहा अन्य जणांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


अमित जेठवा यांची २०१० मध्ये हत्या करण्यात आली होती. गिर वन क्षेत्रात अवैध खनन होत असल्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. विशेष सीबीआयचे न्यायाधीश के. एम. दवे यांनी सोळंकी आणि त्यांचा पुतण्या यांना १५-१५ लाख रुपये दंडही आकारला आहे. त्यांचा पुतण्याही या प्रकरणात आरोपी आहे. न्यायालयाने निर्णय देताना सोळंकी आणि त्यांचा पुतण्या शिवा सोळंकी याला हत्या आणि कट रचणे या प्रकरणात दोषी ठरविले. सोळंकी हे २००९ ते २०१४ या काळात जुनागडचे खासदार होते. या प्रकरणात अन्य दोषींमध्ये शैलेश पांड्या, बहादूरसिंह वढेर, पंचनजी देसाई, संजय चौहान आणि उदाजी ठाकोर यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?
वकील असलेल्या अमित जेठवा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांनी २०१० मध्ये गिर अभयारण्य आणि आजूबाजूच्या अवैध खननाबद्दल जनहित याचिका दाखल केली होती.
सोळंकी आणि त्यांच्या पुतण्याला या प्रकरणात प्रतिवादी बनविण्यात आले होते. जेठवा यांनी या प्रकरणात अनेक कागदपत्रे सादर केले होते.
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान जेठवा यांची २० जुलै २०१० रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या बाहेर गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
सुरुवातीला अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास करून दिनू सोळंकी यांना क्लीन चिट दिली होती. तपासावर असमाधान व्यक्त करीत उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते.

Web Title: Seven persons, including former MP Solanki, have been given life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.