चीनच्या सात युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:03 AM2019-09-17T05:03:05+5:302019-09-17T05:03:19+5:30

हिंदी महासागर क्षेत्र व सभोवताली चीन नौदलाच्या सात युद्धनौका कार्यरत आहेत.

Seven ships of China in the Indian Ocean area | चीनच्या सात युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात

चीनच्या सात युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात

Next

नवी दिल्ली : हिंदी महासागर क्षेत्र व सभोवताली चीन नौदलाच्या सात युद्धनौका कार्यरत आहेत. या नौकांमध्ये २७ हजार टनांचे जमीन आणि पाण्यात संचार करू शकेल असे जहाज आहे. पी-८१ पाणबुडीविरोधी लांब पल्ल्याच्या देखरेख विमानाने या नौकेचे छायाचित्र टिपले होते आणि चीनच्या या नौका सक्रिय असताना व त्यांच्या हालचाली सुरू असताना त्यांचा मार्ग शोधला जात होता व त्यांची छायाचित्रे हे विमान काढत होते. लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक नौकांशिवाय चीनच्या युद्धनौकांमध्ये तीन-तीन नौका या चाचेगिरीविरुद्ध एस्कॉर्ट टास्कफोर्स ३२ व एस्कॉर्ट टास्कफोर्स ३३ आहेत. हिंदी महासागरात या नौकांचे अस्तित्व आणि त्या भारताच्या इकॉनॉमिक झोन्स आणि भारतीय सागरी हद्दीजवळून जाताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.
>ही जहाजे भारतीय नौदलाने मूळ अमेरिकन पी-८१ पाणबुडीविरोधी हेरगिरी विमानांच्या आणि इतर देखरेखीच्या साधनांनी अतिशय जवळून शोधून काढली आहेत. चीनच्या डॉक क्षियान-३२ ही लँडिंग प्लॅटफॉर्म युद्धनौका दक्षिण भारतीय महासागरातून जाताना व श्रीलंकेच्या समुद्रात प्रवेश करताना या महिन्याच्या प्रारंभी दिसली होती.

Web Title: Seven ships of China in the Indian Ocean area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन