रिक्षातून लांबविले महिलेचे सात तोळे सोने
By Admin | Published: February 24, 2016 12:40 AM2016-02-24T00:40:52+5:302016-02-24T00:40:52+5:30
जळगाव: रिक्षात बसून आई-वडीलांकडे जाणार्या प्रिती राजेश चौधरी (रा.अहमदाबाद) या विवाहितेच्या बॅगमधून दोन लाख रुपये किमतीचे सात तोळे लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरात घडली. प्रिती व त्यांचे पती राजेश चौधरी लहान मुलीसह हे अहमदाबाद येथून लग्नासाठी जळगावात आले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्ाची नोंद झालेली नव्हती.
ज गाव: रिक्षात बसून आई-वडीलांकडे जाणार्या प्रिती राजेश चौधरी (रा.अहमदाबाद) या विवाहितेच्या बॅगमधून दोन लाख रुपये किमतीचे सात तोळे लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरात घडली. प्रिती व त्यांचे पती राजेश चौधरी लहान मुलीसह हे अहमदाबाद येथून लग्नासाठी जळगावात आले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला गुन्ाची नोंद झालेली नव्हती.रामानंद नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुरेश पवार यांच्या मुलीचे बुधवारी लग्न आहे. प्रिती या त्यांच्या भाची आहेत. या लग्नासाठी ते दोघं पती-पत्नी व मुलगी विशाखापनम एक्सप्रेसने मंगळवारी जळगावात आले.रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर दोघं जण संभाजी नगरात जाण्यासाठी एका रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.८४४३) बसले. त्याच रिक्षात नेहरु पुतळ्याजवळून चार महिला बसल्या. पुढे या महिला नवीन बसस्थानकाजवळ उतरल्या. प्रिती यांचे आई-वडील हे संभाजी नगरात वास्तव्याला आहेत.चौधरी दाम्पत्य हे घरी पोहचल्यावर फ्रेश झाले. मामा पवार यांच्याकडे नागेश्वर कॉलनीत संध्याकाळी मुलीचा हळदीचा कार्यक्रम असल्याने तेथे जाण्याची तयारी करीत असताना पर्स उघडून पाहिली असता त्यातील पोत, नेकलेस, टॉप्स व कानातील वेल असे साडे सहा तोळे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. रिक्षात बसलेल्या सावळ्या रंगाच्या महिलांनीच हे सोने लंपास केल्याचा संशय आहे.