जिल्हाधिकार्यांच्या आदेशाकडे सात तहसिलदारांचे दुलर्क्ष
By Admin | Published: March 25, 2015 09:09 PM2015-03-25T21:09:56+5:302015-03-27T00:40:49+5:30
३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़
३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़
बाळासाहेब जाधव ,लातूर: जिल्ात गौण खनिजाचा उपसा करणार्या वाळू व खडी केंद्र चालविणार्या माफीयाविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या उदिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसिलदारांची झाडाझडती केली त्यामुळे जळकोट, देवणी आणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तहसिलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिली आहे तसेच थकबाकी असतांनाही खडी केंद्र सुरू ठेवणार्या खडी केंदांना सील ठोकण्याचे सिल ठोकण्याचे काम सुरू केले आहे़परंतु इतर सातही तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवुन जिल्हाधिकार्यांच्या आदेशाकडे चक्क दुलर्क्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे़
गौन खनिजाचा उपसा करणार्या वाळुमाफीयाविरूध्द कारवाईची मोही सुरू केली आहेग़ौण खनिजाचा उपसा करणार्या माफीयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अवैध गौण खनिजाचा उपसा करणार्या ९१२ जणांवर कारवाई करून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे़यामध्ये किरकोळ वाळुवाहतुक करणार्या व्यापार्यावर कारवाई करून मुख्य गौणखनिजाचा उपसा करणार्या माफीयाकडे दुलर्क्ष केले असल्याचे आढळुन आलेले आहे़तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्ाला २० कोटी ३ लाखाचे उदिष्ठ देण्यात आले होते त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़उर्वरीत ६ कोटीच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेडलाईन दिली असतांनाही फक्ती तीन तालुक्यातील तहसिलरांनी कारवाईला गती दिली आहे़जिल्हाधिकार्याच्या आदेशानुसार जळकोट अधिकृत असलेल्या एका खडीकेंद्रावल्याकडुन दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडीकेंद्रवाल्याकडूनही १ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे़परंतू वाळूघाट मात्र एकही नाही़देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्रवाल्याकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये व वाळूउपसा करणार्या वाळुमाफीयाकडून ४ लाखाचा दंड असे एकुण २९ लाख रूपये वसुल केले आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक खडीकेंद्र असून थकबाकीमुळे सिल केले आहे़त्या केंद्रचालकाकडून ३ लाख रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़ तर दगड ,मुरूमाची वाहतुक करणार्याकडून ६५ हजाराचा दंड वसुल केला आहे़तर इतर सात तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र झोपेचे सोंग घेवून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाकडे दुलर्क्ष केल्याचे दिसुन येत आहे़त्यामुळे जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे़