'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 01:51 PM2018-04-16T13:51:16+5:302018-04-16T13:51:35+5:30

समन्यू पोथूराजूची अभिमानास्पद कामगिरी

seven year old boy from hyderabad samanyu pothuraju climbs highest peak in africa mount kilimanjaro | 'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर

'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर

googlenewsNext

हैदराबाद: अवघ्या सात वर्षांच्या समन्यू पोथूराजूनं देशाची मान अभिमानानं उंचावणारी कामगिरी केली आहे. हैदराबादच्या समन्यू पोथूराजूनं आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर केलं आहे. समन्यूनं आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. ध्येय कितीही मोठं असलं, तरी अथक प्रयत्नानंतर ते कमी वयातही साध्य करता येतं, हे समन्यूनं दाखवून दिलं आहे. 

आफ्रिकेच्या टांझानियातील माऊंट किलिमांजारो शिखर करणं अवघड मानलं जातं. या भागातील तापमान कमी असल्यानं पर्वतावर चढाई करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सर्व अडचणींवर मात करत सात वर्षांच्या समन्यूनं समुद्रसपाटीपासून 5 हजार 895 मीटर उंचीवर असणारं किलिमांजारो शिखर त्याच्या प्रशिक्षकांसोबत सर केलं. 'जेव्हा आम्ही चढाई सुरू केली, तेव्हा पाऊस सुरू होता. संपूर्ण वाट दगडांनी भरलेली होती. त्यावेळी मी अतिशय घाबरलो होतो. माझे पाय खूप दुखत होते. मात्र मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाई सुरू केली. मला बर्फ खूप आवडतो. त्यामुळेच चढाईसाठी किलिमांजारो शिखराची निवड केली,' असं समन्यूनं सांगितलं. 

समन्यू किलिमांजरोवर सर्वात कमी वयात यशस्वी चढाई करणारा गिर्यारोहक ठरला आहे. आता त्याला ऑस्ट्रेलियातील शिखरं खुणावू लागली आहेत. समन्यूच्या कामगिरीवर त्याची आई प्रचंड खूष आहे. 'माझ्या मुलानं विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला, याचा खूप आनंद आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव त्याची साथ देता आली नाही. मात्र त्यानं हार न मानता प्रयत्न कायम ठेवले आणि तो यशस्वी झाला,' अशी प्रतिक्रिया समन्यूच्या आईनं दिली. 
 

Web Title: seven year old boy from hyderabad samanyu pothuraju climbs highest peak in africa mount kilimanjaro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.