बलात्काराची खोटी तक्रार करणा-या तरुणीला सात वर्षांची शिक्षा
By admin | Published: May 5, 2017 11:43 AM2017-05-05T11:43:29+5:302017-05-05T12:46:35+5:30
तरुणीने एका तरुणावर आपल्यावर बलात्कार केल्याचा तसंच त्याच्या नातेवाईकांनी यासाठी मदत केल्याचा आरोप केला होता
Next
>ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 5 - बलात्काराची खोटी तक्रार करणा-या तरुणीला स्थानिक न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या तरुणीने एका तरुणावर आपल्यावर बलात्कार केल्याचा तसंच त्याच्या नातेवाईकांनी यासाठी मदत केल्याचा आरोप केला होता. बलात्काराच्या आरोपातून सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मात्र बलात्काराची खोटी तक्रार केल्याबद्दल न्यायालयाने तरुणीला शिक्षा सुनावली आहे.
रोहतकमधील इंदिरा कॉलनीत राहणा-या मिनाक्षीने 14 जून 2010 रोजी संजय सैनी याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. याप्रकरणी संजय सैनी याच्यासोबत त्याची बहिण, भावोजी यांच्यासहित आठ जणांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तब्बल साडे चार वर्ष ही केस चालू राहिली. मात्र मुख्य आरोपीसहित कोणावरही बलात्काराचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही.
अखेर न्यायालयाने 19 जानेवारी 2005 रोजी सर्व जणांची निर्दोष मुक्तता केली. यानंतर न्यायालयाने तरुणीविरोधात खोटी तक्रार केल्याप्रकरणी सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने तरुणीला दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे.