सातव्या वेतन आयोगाची थकबाकी एकरकमी देणार
By admin | Published: July 30, 2016 02:04 AM2016-07-30T02:04:46+5:302016-07-30T02:04:46+5:30
सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (एरियर्स) आॅगस्ट २0१६ च्या वेतनात एकरकमी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली.
नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाची थकबाकी (एरियर्स) आॅगस्ट २0१६ च्या वेतनात एकरकमी देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ आता वाढीव वेतनापोटी मिळणाऱ्या थकबाकीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
आॅगस्टच्या वेतनात ही थकबाकी एकरकमी मिळणार आहे. याचाच अर्थ आॅगस्टच्या वेतनात केंद्रीय कर्मचाऱ्यांना भरघोष रक्कम हाती पडणार आहे.
थकबाकीची रक्कम ‘पे फिक्सेशनच्या प्री-चेकशिवाय’ या पद्धतीने दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीबाबत थोडे बदल केले आहेत. यापुढे १ जानेवारी आणि १ जुलै अशा दोन तारखांना वेतनवाढी दिल्या जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)