ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
By admin | Published: April 13, 2016 07:52 PM2016-04-13T19:52:44+5:302016-04-13T20:28:19+5:30
गुवाहाटीसह ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर, कोलकाता, पटणा, डेहराडून आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - गुवाहाटीसह ईशान्य आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआर, कोलकाता, पटणा, डेहराडून आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. भारतात या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी नोंद झालीय. म्यानमारमध्ये मोठे हादरे बसलेत. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. भारत-म्यानमार सीमा भागात १२५ किमी अंतरावर भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते आहे. त्या ठिकाणी ७.१ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. भूकंपाच्या धक्क्यानं दिल्ली आणि कोलकाता मेट्रो प्रभावित झाली आणि तिची सेवा तात्पुरती थांबवली गेली.
७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का म्यानमारमध्ये जाणवला. जमिनीच्या १७० फूट खाली भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. हिंदुकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले आहे.
या भूकंपामुळे दिल्लीसह इतर शहारातील आणि उत्तर भारतामधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानीचे वृत्त आले नाही. या भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागांचा आश्रय घेतला.
Earthquake was of magnitude 6.9 - 74km SE of Mawlaik, Burma: USGS
— ANI (@ANI_news) April 13, 2016