लाखेगाव येथे पाण्याची भीषण टंचाई
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:38+5:302015-02-14T23:50:38+5:30
कचनेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे.
क नेर : पैठण तालुक्यातील लाखेगाव- अलीपूर येथे पिण्याच्या पाण्याची दीड महिन्यापासून तीव्र टंचाई असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना भरउन्हात फिरावे लागत आहे. गावातील हातपंप शेवटची घटिका मोजत आहे. सरपंच अंकुश रहाटवाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शासनाकडे अधिग्रहण विहिरीसाठी प्रस्ताव तीन-चार दिवसांपूर्वी पाठविला आहे. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तातडीने पिण्याच्या पाण्याची शासनाने व्यवस्था करण्याची मागणी सरपंच अंकुश रहाटवाडे यांनी केली आहे. शेतकर्याची आत्महत्यालिंबेजळगाव : तुर्काबाद खराडीजवळील राजुरा येथील कर्जबाजारी शेतकर्याने विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. गंगापूर तालुक्यातील राजुरा येथील शेतकरी कारभारी अंबादास बोबडे (५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:च्या शेत गट क्र. १४ मध्ये जाऊन कपासीवर मारण्याचे मोनोसील हे विषारी औषध शुक्रवार रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सेवन केले. बेशुद्धावस्थेत त्यास मुलगा व नातेवाईकांनी उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. कारभारी अंबादास बोबडे या शेतकर्याकडे बँक ऑफ महाराष्ट्र, तुर्काबाद शाखेचे ५० हजार रुपये पीककर्ज तसेच राजुरा येथील संत ज्ञानेश्वर बचत गटाचे ८७ हजार ५०० रुपये कर्ज होते. गंगापूर तालुक्यात सतत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांतील पीकपाणी ठीक नाही. बोबडे यास शेत गटक्रमांक १४ मध्ये ३ एकर १० गंुठे जमीन असून शेतात विहीर खोदलेली आहे. ती ५१ फूट खोल आहे. बोबडे यांनी शेतात मिरची, वांगे, मका व कापसाची लागवड केली होती. मात्र, शेतातील विहिरीचे पाणी हळूहळू कमी होऊन विहीर पाण्याविना कोरडीठाक पडलेली आहे. त्यामुळे शेतात लावलेले मिरचीचे पीक वाळून गेले असून वांगे व मका जेमतेम झाले, तर कपासीचे पीकही फारसे आले नाही. त्यात कापसाला यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे निराश होऊन कारभारी बोबडे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. कारभारी बोबडे हे शेतात वस्ती करून कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी व आई तसेच नातवंडे आहेत. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.