रेल्वे तिकीटांसाठी सीवो-टीव्हीएम मशीन लवकरच

By Admin | Published: December 9, 2015 11:55 PM2015-12-09T23:55:58+5:302015-12-09T23:55:58+5:30

(फोटो आहे)

Sevo-TVM Machine for Railway Tickets | रेल्वे तिकीटांसाठी सीवो-टीव्हीएम मशीन लवकरच

रेल्वे तिकीटांसाठी सीवो-टीव्हीएम मशीन लवकरच

googlenewsNext
(फ
ोटो आहे)
रांगेतून मुक्ती : धुळीमुळे यंत्रामध्ये बिघाड
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची तिकीट खिडकी वरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकार सीओ-टीव्हीएम (व्हर्सोटाईल)मशीन येत्या पंधरवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे.यामुळे प्रवाशांना रांगे शिवाय रेल्वे तिकीट मिळणार आहे. भुसावळ मंडळात २४ मशीन प्राप्त झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
रेल्वे स्थानकांवर प्रवराशांना तिकीट मिळण्यासाठीचे आधुनिक सीवो-टीव्हीएम मशीन रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. ते लवकरच कार्यान्वित होऊन प्रवाश्यांना त्याचा लाभ होणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ए प्लस व ए गटात मोडणार्‍या स्थानकांवर हे मशिन कार्यान्वित होणार आहे. जिल्‘ातील जळगाव,भुसवळ,चाळीसगाव या ए वर्ग तर बी वर्गातील पाचोरा स्थानकांवर मशीन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रांगेतून मुक्ती
प्रवाशांना रेल्वेचे साधारण तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासाठी स्थानकावर चौकशी कार्यालयाशेजारी दोन मशीन सुरू करण्यात येणार आहे. या मशीन वरून प्रवाशांना एटीव्हीएम मशीनचे स्मार्टकार्ड रिचार्ज, तिकीट काढणे,प्लॅटफार्म तिकीट,सिझन तिकीट सहज मिळू शकणार आहे.
नोटा, कॉईन व कार्डची व्यवस्था
या मशीनमध्ये पाच रुपयांच्या नाण्यांचा व ५ च्या पटीत नोटांचा व एटीव्हीएम स्मार्ट कार्डाचा वापर करुन प्रवाशांना आपल्या प्रवासाचे तिकीट उपलब्ध होणार आहे.
सवलत तिकीट नाही
मशीन वर कुठले ही सवलतीचे तिकीट मिळणार नाही. पूर्ण व आर्धे असे दोन प्रकारतील तिकीट मशीन वरुन उपलब्ध होणार आहे.
धुळीचा त्रास
स्थानकावर रेल्वे तिकीट उपलब्ध होण्यासाठी तीन एटीव्हीएम मशीन सुरू करण्यात आले आहे. त्यांचा उपयोग काही प्रमाणात प्रवाशांकडून घेण्यातही येत आहे मात्र परिसरातील धुळीचा परिणाम मशीनींच्या सेंन्सर वर होत असल्याने मशीन वापरात अडचणी येत आहे. यामुळेच अनेक वेळा मशीन बंद अल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होत आहे.

Web Title: Sevo-TVM Machine for Railway Tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.