सर्ईदने पुन्हा ओकली गरळ

By admin | Published: April 19, 2015 02:13 AM2015-04-19T02:13:58+5:302015-04-19T02:13:58+5:30

जिहादचा राग आळवत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धात फुटीरतावादी काश्मिरींना पाठिंबा देण्याचा इरादा स्पष्ट केला

Seward again fades back | सर्ईदने पुन्हा ओकली गरळ

सर्ईदने पुन्हा ओकली गरळ

Next

जिहादी राग आळवला : भारताला काश्मीर सोडण्यास भाग पाडू; फुटीरवाद्यांना पाठिंबा
लाहोर : जिहादचा राग आळवत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने काश्मीर बळकावण्यासाठी पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धात फुटीरतावादी काश्मिरींना पाठिंबा देण्याचा इरादा स्पष्ट केला. ‘‘फुटीरवादी नेता मसरत आलमने पाकिस्तानी ध्वज फडकवून काहीही गैर केले नाही. श्रीनगर हा वादग्रस्त भाग आहे. तेथे पाकिस्तानच्या बाजूने नारेबाजी करणे गुन्हा कसा होऊ शकतो?’’ अशी प्रक्षोभक विधाने सईद करीत असतानाच काश्मीर खोऱ्यात हुरियतच्या जहाल गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारीही हिंसक वळण घेतले. बडगाम जिल्ह्यात निदर्शनादरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) केलेल्या गोळीबारात एक युवक ठार तर दोघे जखमी झाले. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने दिले आहेत.
एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हाफिज सईदने शब्दागणिक भारतविरोधी द्वेष व्यक्त केला. जिहाद हे इस्लामिक सरकारचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानमधील सरकारही याकामी भूमिका घेत आले आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांना पाकिस्तान सरकार आणि लष्कर मदत करीत आहे. काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने काश्मीरमध्ये जिहाद केला जात असल्याचे सांगत त्याने काश्मीरमधील कुरापतींमागे पाकिस्तान सरकार आणि लष्कर असल्याचीच कबुली दिली.

कट्टरपंथी झाले आक्रमक
पाकिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करणारा फुटीरवादी नेता मसरत आलम याला झालेली अटक आणि त्रालमध्ये गेल्या आठवड्यात दोन तरुणांना ठार करण्यात आल्याच्या विरोधात हुरियतच्या कट्टरपंथी गटाने शनिवारी बंदचे आवाहन केले होते.

हुरियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे अध्यक्ष मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी गुरुवार रात्रीपासूनच नजरकैदेत आहेत.

हा लढा अधिक तीव्र करून भारताला काश्मीरचा त्याग करण्यास भाग पाडू. काश्मिरी जनतेचा आवाज दडपण्याचा भारत सरकारने प्रयत्न केल्यास आम्हीही ताकदीनिशी बदला घेऊ.
- हाफीज सईद

च्जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे (जेकेएलएफ) अध्यक्ष यासीन मलिक आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना ते नरबलच्या दिशेने आगेकूच करीत असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी मैसूमा येथेच त्यांना अटक केली.
च्विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहतीच्या प्रस्तावाविरुद्ध मलिक यांच्यासोबत ३० तासांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी अग्निवेश येथे आले आहेत. काश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र वसाहती स्थापन करण्याच्या नावावर लोकांचे विभाजन करण्याची परवानगी आम्ही कदापि देणार नाही, असे मलिक यांनी सांगितले.

Web Title: Seward again fades back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.