सेक्स नाकारणाऱ्या पत्नीस पती देऊ शकतो घटस्फोट

By admin | Published: October 12, 2016 06:52 PM2016-10-12T18:52:29+5:302016-10-12T18:52:29+5:30

पत्नीने जर शारीरिक संबंधासाठी वेळोवेळी नकार दिला आणि त्याचे ठोस कारण नसेल तर तो मानसिक छळ आहे. आणि यासाठी तुम्हाला घटस्फोट घेता येऊ शकतो

Sex can be given to husbands rejecting divorce | सेक्स नाकारणाऱ्या पत्नीस पती देऊ शकतो घटस्फोट

सेक्स नाकारणाऱ्या पत्नीस पती देऊ शकतो घटस्फोट

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - पत्नीने जर शारीरिक संबंधासाठी वेळोवेळी नकार दिला आणि त्याचे ठोस कारण नसेल तर तो मानसिक छळ आहे. आणि यासाठी तुम्हाला घटस्फोट घेता येऊ शकतो. असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आज एका सुनावनी दरम्यान हा निर्णय देण्यात आला.

याचिकाकर्त्याने न्यायालयात असा खटला दाखल केला होता की, मागील साडे चार वर्षापासून पत्नी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवत नाही. तीला कोणतेही शारिरीक अपंगत्वही नाही. हा माझ्यासाठी मानसिक त्रास आहे.
नवी दिल्ली उच्चन्यायालयाने पतीच्या बाजूने निकल देताना म्हटले की, न्यायालयात महिलेने तिच्यावरील आरोपाचं खंडन केले नव्हतं. त्या महिलेच्या विकलाने कोर्टाच आपली बाजू मांडताना म्हटलं की त्याने आपला मुद्दा कोर्टात अदक मजबुतीने मांडला आणि त्याने तो सिद्दही केला.

याचिकाकर्त्याने कोर्टात सांगितले की, 26 नोव्हेंबर 2001 रोजी हरियाणा येथे त्याचे लग्न झाले. 2014 मद्ये घटस्फोटाचा खटाला दाखल करते वेळी मला दोन मुले आहेत एक 10 आणि दुसरा 9 वर्षाचा आहे. पत्नी घरचे कोणतेही काम करत नाही. त्याचा मला आणि माझ्या घरच्यांना मानसिक त्रास होत होता.

Web Title: Sex can be given to husbands rejecting divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.