सेक्स सीडी प्रकरण- कोर्टाने पत्रकार विनोद वर्मा यांना नाकारला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:09 PM2017-11-06T19:09:12+5:302017-11-06T19:12:08+5:30

ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज सोमवारी रायपूर न्यायालयाने फेटाळून लावला.

Sex CD Debate: Court rejects Vinod Verma | सेक्स सीडी प्रकरण- कोर्टाने पत्रकार विनोद वर्मा यांना नाकारला जामीन

सेक्स सीडी प्रकरण- कोर्टाने पत्रकार विनोद वर्मा यांना नाकारला जामीन

Next
ठळक मुद्देमाझ्याकडे छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी आहे. त्यामुळेच छत्तीसगड सरकार माझ्यावर नाराज आहे.आपल्याला जाणुनबुजून फसवलं जात असल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे.

रायपूर - ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटकेत असलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज सोमवारी रायपूर न्यायालयाने फेटाळून लावला. विनोद वर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा छत्तीसगड सरकारमधील एक मंत्र्याच्या सेक्स सीडीशी संबंध आहे. आपल्याकडे छत्तीसगड सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी असल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे.

बचाव पक्षाचे वकील फैझल रिझवी आणि सुदीप  श्रीवास्तव यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना विविध आधारावर जामीन देण्याची विनंती केली. ते ज्येष्ठ पत्रकार असल्याचेही सांगितले. पण फिर्यादी पक्षाने या जामिनाला विरोध केला. विनोद वर्मा यांना 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 

27 ऑक्टोंबरला छत्तीसगड पोलिसांनी विनोद वर्मा यांना गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणा-या त्यांच्या घरातून अटक केली. विनोद वर्मा एक वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी बीबीसीसाठी काम केलं आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरात 500 सीडी, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडले. या सर्व सीडी वाटण्यात येणार होत्या असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र सीडीमध्ये नेमकं काय आहे याबद्दल सांगण्यास त्यांनी नकार दिला. 

'माझ्याकडे छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी आहे. त्यामुळेच छत्तीसगड सरकार माझ्यावर नाराज आहे', असं विनोद वर्मा यांनी न्यायालयात नेलं जात असताना पत्रकारांना सांगितलं. आपल्याला जाणुनबुजून फसवलं जात असल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. 'ही सीडी पब्लिक डोमेन असून, आपला याच्याशी काही संबंध नाही', असंही त्यांनी सांगितलं. 

राजेश मूणत यांनी मात्र ही सीडी बनावट असल्याचा दावा केला असून, तुम्हाला हवं असेल त्यांना तपास करायला सांगा असं सांगत आव्हान दिलं आहे. पत्रकार परिषदेत राजेश मूणत यांनी सांगितलं की, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सीडीबद्दल माहिती मिळाली असून, ही पुर्णपणे बनावट आहे. ज्या एजन्सीला तपास करायला सांगायचं आहे त्यांना सांगा. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत'. छत्तीसगड भाजपाने विनोद वर्मा यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते पत्रकार आहेत की काँग्रेसचे एजंट असा प्रश्न विचारला. 
 

Web Title: Sex CD Debate: Court rejects Vinod Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.