लैंगिक शोषण; निवारागृहास टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 04:49 AM2018-12-04T04:49:12+5:302018-12-04T04:49:16+5:30
ओडिशातील स्वयंसेवी संस्थेच्या निवारागृहात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारीनंतर संस्थेच्या २ पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे
ढेंकनाल : ओडिशातील स्वयंसेवी संस्थेच्या निवारागृहात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारीनंतर संस्थेच्या २ पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे आणि निवारागृहाला टाळे ठोकण्यात आले. ‘गुड न्यूज इंडिया’ संस्थेमार्फत हे निवारा घर चालविले जात होते. काही दिवसांपूर्वी येथील काही अल्पवयीन मुलींनी तक्रार केली होती की, या संस्थेचे संस्थापक फयाज रेहमान आणि देखभाल करणारे सिमंचल नायक यांनी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हे निवारागृह सील करण्यात आले आहे. नायक आणि या निवारागृहाचा सहायक संचालक उदित लिमा यांना अटक करण्यात आली आहे. हे निवारागृह नोंदणीशिवाय दोन वर्षांपासून सुरू होते. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री प्रफुल्ला सामल यांनी या संस्थेची २२ निवारागृह बंद करण्याचे आदेश दिले. (वृत्तसंस्था)
>दिल्लीतील आश्रमशाळेतून नऊ मुली बेपत्ता
दिल्ली येथील दिलशाद गार्डन भागात संस्कार आश्रम या आश्रमशाळेतून नऊ मुली सोमवारी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले आहेत.