11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं बलात्कार, 4 दोषींना तुरुंगवासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 09:28 PM2020-02-03T21:28:47+5:302020-02-03T21:46:13+5:30
11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चेन्नईः 11 वर्षांच्या मुलींवर 7 महिन्यांपर्यंत आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष न्यायालयानं बलात्कारातील 15 दोषींना शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात न्यायालयानं हा निवाडा केला आहे. बलात्कार प्रकरणात 25 वर्षांपासून 66 वर्षांच्या वयाच्या आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी बाल लैंगिक अपराधांचे संरक्षण (POSCO)अंतर्गत दोषी आढळले आहेत. न्यायालयानं चार दोषी रविशंकर (56), सुरेश (32), अभिषेक (28) आणि पलानी (40) यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे, तर इतर 11 दोषींपैकी एकाला आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे. 9 दोषींना पाच वर्षांचा तुरुंगवास, तर एका दोषीला 7 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदा जेव्हा या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, तेव्हा 17 जणांविरोधात आरोप लावण्यात आले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एकाला पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले.
मुलीनं मोठ्या बहिणीला सांगितली आपबिती
जुलै 2018मध्ये हे प्रकरण घडलं होतं, जेव्हा पीडितेनं आपल्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर बहिणीनं पोलिसांत जाऊन 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व दोषी त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये कामाला होते, जिथे ती मुलगी राहते. या दोषींना जानेवारी ते जुलैदरम्यान त्या लहान मुलीवर बऱ्याचदा अत्याचार केला.
सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकून करत होते अत्याचार
बलात्कार करणारे सिक्युरिटी गार्ड, प्लंबर आणि कॉम्प्लेक्समध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात. त्या मुलीला ते लोक सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार करत होते. सप्टेंबर 2018मध्ये आरोपींविरोधात कलम 307, 506, POSCO आणि इतर कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.