बिहारच्या आणखी १४ बालगृहांत लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:41 AM2018-08-13T05:41:18+5:302018-08-13T05:42:03+5:30
मुझफ्फरपूर येथील प्रकरण गाजत असतानाच बिहारमधील आणखी १४ बालगृहांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडले असल्याचे टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) अहवालात म्हटले आहे.
पाटणा - मुझफ्फरपूर येथील प्रकरण गाजत असतानाच बिहारमधील आणखी १४ बालगृहांमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार घडले असल्याचे टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) अहवालात म्हटले आहे. या बालगृहांतील मुलींचा मानसिक छळ व मारहाणही करण्यात येत असे.
टीसने बिहारच्या समाजकल्याण विभागाला १५ मार्च रोजी अहवाल सादर केला होता. टीसने राज्यातील ११० बालगृहे व निवारागृहांची बारकाईने तपासणी केली होती. अहवालात म्हटले की, बालगृहांमध्ये मूत्राने भरलेल्या बाटल्या आढळल्या. रात्री या मुलींना खोलीत कोंडल्यानंतर त्यांना या बाटल्यांमध्ये मूत्रविसर्जन करण्याची सक्ती करण्यात येत होती.
मोतिहारी येथे निर्देश या स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालगृहामध्ये तेथील कर्मचारी मुलांना पाइपने मारहाण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंगेर येथे पनाह या संस्थेतर्फे चालविण्यात येणाºया बालगृहात मुलांच्या खोल्या म्हणजे एक प्रकारची कोठडीच होती.
डीओआरडी या संस्थेकडून चालविल्या जाणाºया गया येथील बालगृहात महिला कर्मचारी तेथील मुलांना कागदाच्या कपट्यांवर अश्लील संदेश लिहायला भाग पाडत व हे कागद इतर महिला कर्मचाºयांकडे नेऊन देण्यासाठी भाग पाडत.
अरारिया येथील बालगृहात एका मुलाला तेथील पोलिसाने सळईने मारले होते.