500 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड

By admin | Published: January 16, 2017 11:39 AM2017-01-16T11:39:46+5:302017-01-16T11:39:46+5:30

शाळकरी विद्यार्थिंनींवर लैंगिक अत्याचार करणा-या 38 वर्षांच्या एका सीरियल रेपिस्टला पोलिसांनी अटक केली आहे.

Sexual harassment over 500 girls | 500 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड

500 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा गजाआड

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - शाळकरी विद्यार्थिंनींना टार्गेट करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या 38 वर्षांच्या एका सीरियल रेपिस्टला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत जी काही माहिती सांगितली, ते ऐकून पोलिसांनाही जबर धक्का बसला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12 वर्षांमध्ये या वासनांध व्यक्तीने 500 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
 
सुनील रस्तोगी असे आरोपीचे नाव असून कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपी विवाहित असून त्याला पाच मुलं असून त्यापैकी तीन मुली आहेत. 2006 मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यानं पुन्हा शाळकरी मुलींना आपले शिकार करण्यास सुरूवात केली. 
 
13 डिसेंबर 2016 मध्ये दिल्लीतील के. न्यू. अशोक नगर परिसरातील एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर 10 जानेवारी रोजी अपहरणाच्या आणखी दोन तक्रारी पोलिसांकडे आल्या. या तिन्ही घटना एक सारख्याच आणि यामागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
 
याप्रकरणी हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मुलीने आरोपीला ओळखले, आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 1990 साली नवी दिल्लीत आलेल्या हा आरोपी टेलर म्हणून काम करत होता.  गेल्या 12 वर्षांमध्ये त्याने दिल्ली, गाजियाबाद आणि रुद्रपूरमधील 8 ते 12 वर्षांच्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. हा नराधम लहान मुलीला चॉकलेट आमिष देऊन त्यांना निर्जनस्थळी न्यायचा. आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. 
 
 
 
 

Web Title: Sexual harassment over 500 girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.