शहरात सेक्सबद्दल खुलेपणा वाढतोय, वीसवर्षाखाली गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2016 09:50 AM2016-04-13T09:50:48+5:302016-04-13T09:50:48+5:30
शहरी भागात तरुणाईचा सेक्स बद्दलचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. इथे सेक्स, शरीरसंबंध सामान्य बाब बनले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, १३ - शहरी भागात तरुणाईचा सेक्स बद्दलचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. इथे सेक्स, शरीरसंबंध सामान्य बाब बनले आहेत. शहरी भागातील गर्भपाताच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, वीस वर्षाखालील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. कमी वयातच तरुण-तरुणी शारीरीक सुखाच्या ओढीने जवळ येत असून, सेक्सबद्दल अधिक खुलेपणा येत असल्याचे हे लक्षण आहे.
सरकारच्या आरोग्य सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एनएसएसओच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या स्त्रियांचे प्रमाण ७७ टक्के तर, शहरी भागात ७४ टक्के आहे. ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण दोन टक्के तर, शहरात तीन टक्के आहे. पण शहरी भागात वीसवर्षाखालील वयोगटातील गर्भपात करण्याचे प्रमाण सर्वाधिक १४ टक्के आहे.
१५ ते ४९ वयोगटात ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या महिलांचे प्रमाण ९.६ टक्के तर, शहरात ६.८ टक्के आहे. ग्रामीण भारतात ५६ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, २४ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो. शहरी भागात ४२ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, ४८ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो.