शबरीमला : निकालपत्र केंद्राने बारकाईने वाचावे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:20 AM2019-11-16T06:20:58+5:302019-11-16T06:21:28+5:30
शबरीमला खटल्यात दिलेल्या निकालाला विरोध करून दोन न्यायाधीशांनी दिलेले असहमतीचे निकालपत्र अतिशय महत्त्वाचे असून, ते केंद्र सरकारने बारकाईने वाचले पाहिजे, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी शुक्रवारी सांगितले.
नवी दिल्ली : शबरीमला खटल्यात दिलेल्या निकालाला विरोध करून दोन न्यायाधीशांनी दिलेले असहमतीचे निकालपत्र अतिशय महत्त्वाचे असून, ते केंद्र सरकारने बारकाईने वाचले पाहिजे, असे न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी शुक्रवारी सांगितले.
शबरीमला येथील आय्यप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी दिलेला निकाल एकमताने झाला नाही. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. अजय खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा या तीन न्यायाधीशांनी हा खटला सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केला, तर न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. धनंजय चंद्रचूड यांनी त्यास विरोध करून असहमतीचे स्वतंत्र निकालपत्र लिहिले. न्या. रोहिंग्टन नरिमन यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले की, निकालपत्र अधिकाऱ्यांना बारकाईने वाचायला सांगा.