शाहरुख खानकडे काळा पैसा ? परदेशातील संपत्तीसंबंधी आयकर विभागाची नोटीस

By admin | Published: July 25, 2016 08:45 AM2016-07-25T08:45:38+5:302016-07-25T09:13:12+5:30

शाहरुख खानला आयकर विभागाने नोटीस पाठवली असून टॅक्स हेवन देशांमधील कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे

Shah Rukh Khan black money? Notice from Income Tax Department on Foreign Assets | शाहरुख खानकडे काळा पैसा ? परदेशातील संपत्तीसंबंधी आयकर विभागाची नोटीस

शाहरुख खानकडे काळा पैसा ? परदेशातील संपत्तीसंबंधी आयकर विभागाची नोटीस

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 25 -  काळा पैसा भारतात आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत आता बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याचं दिसत आहे. शाहरुख खानला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. शाहरुख खानला पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये परदेशात करण्यात आलेल्या गुंतवणुकीची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. 
 
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार शाहरुख खानने बर्मुडा, ब्रिटीश वर्जिन आयलँड आणि दुबईत केलेल्या गुंतवणुकीची माहिती आयकर विभागाने मागितली आहे. परदेशात गुंतवणूक करणा-या भारतीयांची आयकर विभागाकडे मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. मात्र शाहरुख खानने आपली परदेशातील संपत्ती लपवली असल्याचा कोणता पुरावा आयकर विभागाकडे उपलब्ध आहे का ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 
 
आयकर विभाग कायदा 131 कलम अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये आयकर विभागाच्या अधिका-यांनी चौकशी करण्याचा अधिकार आहे. टॅक्स हेवन देशांमधील कंपन्यांमध्ये शाहरुख खानच्या फक्त शेअर्सची माहिती न ठेवता त्या कंपन्यांची इतर माहितीही मिळवण्याचा प्रयत्न आयकर विभाग करत आहे. यासंबंधी शाहरुख खानचे व्यवसाय व्यवस्थापक आणि सह-निर्माते करुणा बडवाल यांना ई-मेलही पाठवण्यात आला, मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही. 
 
(पनामा प्रकरणात भारतातील आणखी दोन हजार नावे)
(पनामा पेपर्सची माहिती टाकली ऑनलाइन)
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान व्यतिरिक्त काही उद्योजकांना ज्यांनी सिंगापूरमार्गे गुंतवणूक केली आहे त्यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्र सरकारने काळा पैसा भारतात आणण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ज्यामध्ये श्रीमंत भारतीय ज्यांनी आपली परदेशातील संपत्ती, बँक अकाऊंट, स्टॉक उघड केलेले नाहीत त्यांच्या मागोवा घेतला जात आहे. 
 

Web Title: Shah Rukh Khan black money? Notice from Income Tax Department on Foreign Assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.