शहीद हनुमंतप्पा यांच्या पत्नीने मुलीला लष्करात भर्ती करण्याची इच्छा केली व्यक्त
By admin | Published: February 26, 2016 04:59 PM2016-02-26T16:59:28+5:302016-02-26T17:12:12+5:30
शहीद हनुमंतप्पा यांची पत्नी महादेवी यांनी आपली एकुलती एक मुलगी मोठी झाल्यावर लष्करात भर्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. २६ - शहीद हनुमंतप्पा यांची पत्नी महादेवी यांनी आपली एकुलती एक मुलगी मोठी झाल्यावर लष्करात भर्ती व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. शहीद हनुमंतप्पा यांच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली असेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
'मला मुलगा नाही मात्र मुलगी असल्याचं दुख नाही आहे, तिने मोठ झाल्यावर सैन्यात भर्ती व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि हीच तिच्या शूर वडिलांसाठी खरी श्रद्धांजली असेल असं शहीद हनुमंतअप्पा यांची पत्नी महादेवी बोलल्या आहेत. शहीद हनुमंतप्पा यांच्या सन्मानार्थ नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवा जागरण मोर्चातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरीदेखील उपस्थित होत्या. कांचन गडकरी यांच्या हस्ते शहीद हनुमंतअप्पा यांच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. शहीद हनुमंतअप्पा यांची पत्नी महादेव, आई बसम्मा आणि भाऊ शंकर गावडा उपस्थित होते.
सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आणि ६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांचं 11 फेब्रुवारीला दिल्लीतील लष्करी रुग्णालयात सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले होते.