शहीद पत्नी म्हणून केला भलत्याच स्त्रीचा सत्कार? माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 02:05 AM2017-09-03T02:05:19+5:302017-09-03T02:05:35+5:30
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून बहुधा भलत्याच स्त्रीचा सत्कार केला असण्याच्या शक्यतेने वादाला तोंड फुटले आहे.
आझमगढ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गेल्या बुधवारी येथे झालेल्या कार्यक्रमात परमवीर चक्रविजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या पत्नी म्हणून बहुधा भलत्याच स्त्रीचा सत्कार केला असण्याच्या शक्यतेने वादाला तोंड फुटले आहे.
समाजवादी पक्षाने आझमगढ जिल्ह्यातील शहीद कुटुंबियांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी अखिलेश यादव यांनी शहीद अब्दुल हमीद यांच्या विधवा पत्नी रसूलन बी यांचाही सत्कार केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती.
मात्र, माझा कोणी सत्कार केला नाही. मी घराच्या बाहेरही पडले नाही, असे ९५ वर्षांच्या रसूलन बी यांनी सांगितल्याने अखिलेश यांच्या हस्ते सत्कार झाला ती स्त्री कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्कार समारंभाच्या छायाचित्रात अखिलेश यांच्यासोबत व्यासपीठावर दिसणारी स्त्री माझी आजी नाही, असे रसूलन बी यांच्या नातवानेही स्पष्ट केले.
अब्दुल हमीद हे भारतीय लष्कराच्या ४ ग्रेनेडियर्स बटालियनमध्ये हवालदार होते. सन १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात खेमकरण आघाडीवर अतुलनीय शौर्य गाजवीत प्राणाहुती देण्यापूर्वी शत्रूचे अनेक रणगाडे उद््ध्वस्त केल्याबद्दल त्यांना परमवीरचक्र हे शौर्यासाठीचे सर्वोच्च पदक देऊन मरणोत्तर गौरविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)