शाही इमामांचे नवाज शरीफांना निमंत्रण

By admin | Published: October 31, 2014 01:10 AM2014-10-31T01:10:15+5:302014-10-31T01:10:15+5:30

जामा मशिदीच्या शाही इमामपदाच्या दस्तारबंदी समारोहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न बोलावता पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रित करून नव्या वादाला तोंड फोडले आह़े

Shahi Imam's invitation to Nawaz Sharif | शाही इमामांचे नवाज शरीफांना निमंत्रण

शाही इमामांचे नवाज शरीफांना निमंत्रण

Next
नवी दिल्ली : इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी जामा मशिदीच्या शाही इमामपदाच्या दस्तारबंदी समारोहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न बोलावता पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रित करून नव्या वादाला तोंड फोडले आह़े केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, सपा प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्यासह देशविदेशातील तमाम बडे नेते, धर्मगुरू व मान्यवरांना याचे निमंत्रण पाठविले आह़े मात्र मोदींचे नाव यात नाही़ 
इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी आपला लहान मुलगा सय्यद शाबान बुखारी(19) याला आपला उत्तराधिकारी निवडले आह़े 22 नोव्हेंबरला दस्तारबंदी समारोहात सय्यदला ‘नायब इमाम’ घोषित करण्यात येणार आह़े या सोहळ्यासाठी बुखारींनी शरीफ यांना निमंत्रित केले आह़े केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, भाजपा प्रवक्ते शाहनवाज हुसैन आणि राज्यसभा खासदार विजय गोयल या भाजपाच्या चार नेत्यांची नावेही निमंत्रितांमध्ये आहेत़ 
देश-विदेशातील अनेक राजकीय नेत्यांना दस्तारबंदी सोहळ्यासाठी निमंत्रित केले आह़े 22 नोव्हेंबरला दस्तारबंदी समारोह होईल़ त्या रात्री आणि 25 नोव्हेंबरला खास पाहुणो आणि दिल्लीकरांसाठी मेजवानी होईल़ 29 नोव्हेंबरला अनेक देशांचे राजनयिक, दिग्गज नेत्यांसाठी मेजवानी होईल़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मोदी नेहमीच मुस्लिमांशी अंतर राखून -शाही इमाम
4जामा मशिदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित न करण्यामागचे कारणही स्पष्ट केले आह़े देशातील मुस्लिम अद्यापही मोदींसोबत नाते जुळवू शकलेले नाहीत़ 
4मोदी मुसलमानांच्या प्रतीकांचा वापर करताना संकोचतात़ मुस्लिम समुदाय त्यांच्यासोबत जुळू शकलेला नाही़ मोदींना न बोलविण्यामागे वैयक्तिक आकस नाही; पण त्यांना आम्ही आवडत नाही व आम्हाला ते आवडत नाही़ 
4मोदींनी कधीच मुस्लिमांजवळ जाण्याचे प्रयत्न केले नाहीत़ ते नेहमीच त्यांच्याशी अंतर राखून वागत आले आहेत, असे बुखारी म्हणाल़े

 

Web Title: Shahi Imam's invitation to Nawaz Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.