दुर्देवी! उत्तर प्रदेशमध्ये ट्रक्टरचा मोठा अपघात, १३ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:36 PM2023-04-15T16:36:39+5:302023-04-15T16:39:55+5:30
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. ही घटना तिल्हार पोलीस ठाण्याच्या बिरसिंगपूर गावाजवळची आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. शाहजहांपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगून रुग्णालयाने केले अंत्यसंस्कार; 2 वर्षांनी 'तो' परतला अन्...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाहजहांपूरमधील गररा नदीत झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना पूर्ण उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अपघातात जखमी झालेल्या १५ ते २० जणांवर उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाचे दोन्ही रेलिंग तुटून खाली पडली आणि या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. ट्रॉलीमध्ये सुमारे ४२ लोक होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.