शाहरूख म्हणतो... महिलांना दुखवलं, तर पोटच्या मुलाचंही मुंडकं उडवीन
By admin | Published: January 16, 2017 11:10 AM2017-01-16T11:10:11+5:302017-01-16T11:10:11+5:30
जर महिलांना दुखवलंत तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन व अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - जर महिलांना दुखवलंत तर तुमचं मुंडकं उडवीन अशी ताकीद आर्यन व अबरामला दिल्याचं एका मुलाखतीत शाहरूख खाननं म्हटलं आहे. महिलांचा आदर करायला हवा यावर भर देताना शाहरूख खाननं बेंगळूरूमधल्या महिलांच्या विनयभंगाच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महिलांना चांगल्या दर्जाची वागणूक मिळायला हवीआणि पुरूषांनी महिलांचा सन्मान करायलाच हवा अशी अपेक्षा शाहरूखने व्यक्त केली आहे.
आपल्या मुलांनीही महिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांना आदराची वागणूर दिली पाहिजे अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. आर्यन एवढंच नव्हे तर अबरामलाही आपण तशी तंबी दिल्याचे व त्यांनी महिलांचा अनादर केल्यास मुंडकं उडवण्याची ताकीद दिल्याचे त्याने फेमिनाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मुली म्हणजे तुमच्या चड्ड्या नसतात, त्यांना सन्मान द्या, असं त्यानं पुढे म्हटलं आहे.
शाहरूख खान, अक्षय कुमार, आमीर खान, अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांनी बेंगळुरूमधल्या घटनेची कडक शब्दांमध्ये निर्भत्सना केली आहे. पुरुषांनी जरा पातळीला धरून वागावं असं सांगतानाच महिलांनी देखील स्वसंरक्षणासाठी सज्ज रहायला हवं असा सल्ला मान्यवरांनी दिला आहे.
आणखी वाचा