शायरा बानो यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा, दहा दिवसांपूर्वीच झाल्या होत्या भाजपात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 03:51 AM2020-10-22T03:51:50+5:302020-10-22T07:02:14+5:30
तिहेरी तलाकच्या पद्धतीच्या घटनात्मकतेला सुप्रीम कोटार्त आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
डेहराडून (उत्तराखंड) : तिहेरी तलाकविरोधात संघर्ष केलेल्या शायरा बानो यांना उत्तराखंड सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शायरा बानो या दहाच दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाल्या. यावेळी उत्तराखंड प्रदेश भाजपचे अध्यक्ष बन्सीधर भगत व इतर नेते उपस्थित होते.
तिहेरी तलाकच्या पद्धतीच्या घटनात्मकतेला सुप्रीम कोटार्त आव्हान देणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे प्रसारमाध्यम समन्वयक दर्शनसिंह रावत म्हणाले, शायरा बानो यांच्यासह तीन महिलांना मंगळवारी राज्याच्या महिला आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला गेला आहे. इतर दोन महिलांमध्ये ज्योती शाह आणि पुष्पा पासवान यांचा समावेश आहे. आयोगात तीन जागा बऱ्याच दिवसांपासून रिक्त होत्या. नवरात्रीत मुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेली ही भेट आहे, असे ते म्हणाले.