शेक्सपिअरची 'ती' क्लासरूम प्रेक्षकांसाठी खुली

By admin | Published: April 22, 2016 08:50 PM2016-04-22T20:50:50+5:302016-04-22T20:50:50+5:30

विल्यम शेक्सपिअरची खरी क्लासरूम प्रकाशझोतात आली आहे. याच क्लासरूममध्ये शेक्सपिअरनं खेळण्या-बागडण्यासह अभ्यासाचे धडे गिरवले आहेत.

Shakespeare's 'She' classrooms open to the audience | शेक्सपिअरची 'ती' क्लासरूम प्रेक्षकांसाठी खुली

शेक्सपिअरची 'ती' क्लासरूम प्रेक्षकांसाठी खुली

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22- विल्यम शेक्सपिअरची खरी क्लासरूम प्रकाशझोतात आली आहे. याच क्लासरूममध्ये शेक्सपिअरनं खेळण्या-बागडण्यासह अभ्यासाचे धडे गिरवले आहेत. ही क्लासरूम किंग एडव्हर्ड व्हीआय शाळेच्या मालकीची आहे. 1571साली शेक्सपिअरनं याच क्लासरूममध्ये व्याकरणाचा अभ्यास केला, अशी माहिती शाळेच्या मालकांनी दिली आहे.

या क्लासरूमची दुरुस्ती केल्यानंतर ती लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. या क्लासरूमच्या भिंतीवर रहस्यमयरीत्या साकारलेली चित्रं आकर्षणाचा विषय ठरत आहेत. शेक्सपिअरच्या 400व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी ही क्लासरूम प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे.  या क्लासरूममध्ये शेक्सपिअर 7व्या इयत्तेत असताना शिकत होता. या शाळेत 16व्या शतकात कोणीच विद्यार्थी नव्हता. ही शेक्सपिअरची शाळा असून, वयाच्या 14 ते 15व्या वर्षी तो या शाळेत शिकत असल्याचा दावा वॉरविक युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रॉनी मुलरेन यांनी केला आहे.

शेक्सपिअरसोबत क्लासरूममध्ये वय वर्षं 7 पासून ते 15 वर्षांपर्यंतची जवळपास 40 मुलं शिकत होती. या सर्व मुलांना एकच शिक्षक शिकवत होता. ती मुलं लांबलचक बाकावर बसून खूपच धम्माल करत होती. शेक्सपिअरसोबतची मुलं सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत एकमेकांना खेटून बाकावर बसून दंगामस्तीसोबतच अभ्यासाचे धडे गिरवत होती. त्यांना शिकवणारे शिक्षक खूप उत्तम होते. त्यावेळी लॅटिन आणि रोम भाषेला जास्त महत्त्व दिलं जायचं. एकंदरच शेक्सपिअरनं या क्लासरूममध्ये आयुष्याचे खूप महत्त्वाचे क्षण व्यतित केले आहेत.

शेक्सपिअर कॅथलिक परंपरांचा अनुयायी होता. शेक्सपिअर लॅटिन भाषेचा चांगला जाणकार होता. त्यानं  आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. तरुणपणात आयुष्य कसं जगायला हवं याचं शेक्सपिअरला चांगलं ज्ञान होतं. त्याचा मेंदू कसा काम करतो याचा त्यानं एक चित्रही बनवलं होतं, असं प्राध्यापक मुरलेन यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Shakespeare's 'She' classrooms open to the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.