पलाणीस्वामींची उद्या शक्तिपरीक्षा
By admin | Published: February 17, 2017 03:37 AM2017-02-17T03:37:14+5:302017-02-17T03:37:14+5:30
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी
चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशीकला यांचे निष्ठावंत ई. के. पलाणीस्वामी (६३) यांना अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ते करतानाच त्यांना १५ दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास राज्यपालांनी सांगितले. मात्र, ते १८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करून दाखवणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी शशीकला यांच्याविरोधात बंड केल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाला.
त्यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलाणीस्वामी यांचे फोन करून अभिनंदन केले. द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनीही नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आणि राज्यात स्थिर सरकार राहावे, अशी आशा व्यक्त केली. पलाणीस्वामी यांनी राज्यपाल राव यांच्याकडे आपणास १२४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करीत, त्यांची यादी बुधवारी रात्री सादर केली होती. त्यानंतर, पनीरसेल्वमही राज्यपालांना भेटले. मात्र, त्या वेळी त्यांना १0 आमदारांचाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राव यांनी त्यांना पलाणीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यास गुरुवारी निमंत्रित केले. विधानसभेचे सदस्य २३४ आहे. (वृत्तसंस्था)
पलाणीस्वामी यांचे मंत्रिमंडळ ३१ जणांचे आहे. गेल्या नऊ महिन्यांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे पलाणीस्वामी हे अण्णा द्रमुकचे तिसरे नेते आहेत. जयललिता यांनी मे २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त केले. त्या ७४ दिवस रुग्णालयात असेपर्यंत मुख्यमंत्री होत्या. त्यांचे ५ डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले आणि पनीरसेल्वम मुख्यमंत्रीपद झाले. जयललिता भ्रष्टाचाराच्या खटल्यात तुरुंगात गेल्या तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
पनीरसेल्वमचा संघर्षाचा पवित्रा कायम
ओ. पनीरसेल्वम यांनी जे. जयललिता यांची राजवट स्थापन होईपर्यंत शशीकला व त्यांच्या कुटुंबीयांविरोधातील माझा लढा सुरूच राहील, असे गुरुवारी सायंकाळी म्हटले.
एका कुटुंबाच्या हाती पक्ष व सरकार पुन्हा जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सगळे एक होऊ या. लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे सरकार पुन्हा एकदा आपल्याला स्थापन करायचे आहे आणि ते होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असे ते म्हणाले.