शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:42 PM2018-12-11T18:42:11+5:302018-12-11T20:43:51+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
नवी दिल्ली : उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर माजी आर्थिक सल्लागार आणि वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती करण्य़ात आली.
Reuters: Former finance secretary and current member of the finance commission Shaktikanta Das has been appointed as the Governor of the Reserve Bank of India (RBI). pic.twitter.com/EGgTsXvjd6
— ANI (@ANI) December 11, 2018
उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानाही उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकारसोबतच्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिल्याच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.
दरम्यान, यापूर्वी भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. राजन यांच्या निर्णयानंतरही देशभरात खळबळ उडाली होती. तर, उद्योगजगताने राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यावेळी नोंदवली होती.