शालक-मेहुण्याची पुन्हा बनवाबनवी उघड कारागृहात रवानगी : औरंगाबाद व पालघर नव्हे तर नागपूर, मुंबई शहर येथे केले अर्ज
By admin | Published: April 1, 2016 10:53 PM2016-04-01T22:53:49+5:302016-04-01T22:53:49+5:30
जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथे भरतीसाठी अर्ज केल्याचे दोघांनी सांगितले होते. परंतु पोलीस तपासात त्यांनी नागपूर कारागृह व मुंबई शहर याठिकाणी अर्ज केल्याचे समोर आले आहे.
Next
ज गाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथे भरतीसाठी अर्ज केल्याचे दोघांनी सांगितले होते. परंतु पोलीस तपासात त्यांनी नागपूर कारागृह व मुंबई शहर याठिकाणी अर्ज केल्याचे समोर आले आहे.आरोपी रामचंद्र कपूरचंद भवरे (२९, रा.जोडवाडी कचनेर, ता.जि. औरंगाबाद) व केसरसिंग इंदरसिंग घुशिंगे (१९, रा.जोडवाडी, ता.जि.औरंगाबाद) या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. सरकार पक्षातर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.पोलीस तपासात कागदपत्रे जप्तजिल्हापेठ पोलिसांनी दोघांकडून, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस शिपाई भरतीचा चेस्ट क्रमांकाचे कार्ड, मुंबई पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, आवेदन अर्ज, नागपूर पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र, आवेदन अर्ज अशी कागदपत्रे आरोपींच्या घरी जोडवाडी येथे जाऊन जप्त केली. आरोपींनी चित्ते पिंपळगाव, ता.जि.औरंगाबाद येथील सिद्धी विनायक कॉम्प्युटर्सचे मालक व चालक कैलास उखर्डू मोरे यांच्याकडून संगणकाच्या साहाय्याने भरलेले आहेत. पोलिसांनी तेथे जाऊन सर्व साहित्य जप्त केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतात. एका उमेदवाराला राज्यात एकाच ठिकाणी अर्ज करता येत असताना आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे.