टिष्ट्वटरवर ‘शाली’वाहन ‘शक’!
By admin | Published: April 13, 2015 11:52 PM2015-04-13T23:52:34+5:302015-04-13T23:52:34+5:30
आपल्या नावाचा मोनोग्राम असलेल्या सूटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यांच्या या शालीवरून टिष्ट्वटर युद्धच छेडले आहे.
‘एनएम’वरून गाजले दावे-प्रतिदावे : आता मोदींची शालही वादात
नितीन अग्रवाल ल्ल नवी दिल्ली
आपल्या नावाचा मोनोग्राम असलेल्या सूटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यांच्या या शालीवरून टिष्ट्वटर युद्धच छेडले आहे.
पॅरिसमध्ये परिधान केलेल्या मोदींच्या या शालीवरून सोशल मीडियात खडाजंगी उडाली. मग स्पष्टीकरणाचा दौर झाला व अखेर आरोप करणाऱ्यांना तोंडघशी पडावे लागले. आपल्या परिधानांबद्दल विशेष जागरूक असलेले मोदी यांची ही शाल जगप्रसिद्ध फ्रेंच फॅशन ब्रॅण्ड लुईस विटनची असून यावरही ’एनएम’ लिहिले असल्याचा दावा सोशल मीडिया साईटस्वर काही लोकांनी केला. याच्या पुष्ट्यर्थ अनेक छायाचित्रेही टाकण्यात आली.
मोदींचे चाहतेही मागे कसे राहणार? त्यापैकी एकाने थेट कंपनीलाच ही शाल कुठून खरेदी केली जाऊ शकते, अशी विचारणा केली. मग काय? कंपनीलाही स्पष्टीकरण द्यावे लागले. कंपनीने टिष्ट्वटर अकाऊंटच्या माध्यमाने या प्रश्नाला उत्तर दिले ते असे... ‘आपल्या टिष्ट्वटबद्दल धन्यवाद! पण दुर्दैवाने आपण जे छायाचित्र पाठविले आहे तशी शाल लुई विंताने तयार केलेली नाही. मोदींच्या बाजूने या शालीबद्दल अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु त्यांची प्रतिमा डागाळू नये म्हणून त्यांच्या समर्थकांनीच ही आघाडी सांभाळली. त्यांनी सोशल मीडियावर काही छायाचित्रे टाकली वचौकटीचे डिझाईन असलेल्या या शालीवर ‘एनएम’ शब्द अंकित नसल्याचा दावा केला. शालीचा मुद्दा उचलून धरणाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले,तीव्र प्रतिक्रिया दिल्या.
हळूहळू याचे लोण पसरत गेले आणि अवघ्या काही तासांतच हजारोंच्या संख्येत ‘कमेंट’ आणि ‘रिटिष्ट्वट’ झाले.
अखेर मोदींची शाल लुईस विटन ब्रॅण्डची असल्याचे सांगणाऱ्या ‘टिष्ट्वटर’काराला क्षमा मागावी लागली.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे राजकीय सल्लागार राहिलेले पवन खेडा यांनी या शालबद्दल केलेल्या दाव्यावरून माफी मागितली. अन्य एका टिष्ट्वटरकाराने लिहिले, लुईस विटन टिष्ट्वटसाठी क्षमा मागते. पंतप्रधानांची शाल लुई विंता शाल नव्हती आणि असती तरीही त्यात काही चुकीचे नव्हते.
४पंतप्रधानांनी गेल्या २५ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांच्या पूर्ण नावाचा ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ मोनोग्राम असलेला सूट परिधान केला होता. त्याची किंमत १० लाख रुपये सांगण्यात आली होती. या सूटवरून प्रचंड वादंग झाले.
४एवढे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी याचा मुद्दा बनविला होता. पुढे या सूटचा ४.३१ कोटी रुपयात लिलाव झाला. ही रक्कम गंगा स्वच्छता अभियानासाठी देण्यात आली.