मानवतेची लाज! मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने केली 25 किमी पायपीट, कारण ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 02:44 PM2022-08-03T14:44:09+5:302022-08-03T14:59:36+5:30

Shame on Humanity : मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि त्यादरम्यान येणारे प्रवासी प्रेक्षकाच्या भूमिकेतून पाहत राहतात.

Shame on humanity! The father walked 25 km carrying his son's body on his shoulder in Uttar pradesh | मानवतेची लाज! मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने केली 25 किमी पायपीट, कारण ऐकून व्हाल थक्क

मानवतेची लाज! मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने केली 25 किमी पायपीट, कारण ऐकून व्हाल थक्क

Next
रयागराज : उत्तर प्रदेशातील संगम शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजमध्ये मानवतेला लाजवेल असे दृश्य समोर आले आहे. आपल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाणाऱ्या हतबल बापाचे हे दृश्य उत्तर प्रदेशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कशी कुचकामी आहे याचा खुलासा करत आहे. किंबहुना रुग्णालय प्रशासनाची माणुसकी किती संपली आहे, याचा अनुभव आलेल्या एका असहाय पित्याला आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि त्यादरम्यान येणारे प्रवासी प्रेक्षकाच्या भूमिकेतून पाहत राहतात.

खरं तर, प्रकरण संगम शहरातील एसआरएन हॉस्पिटलचे आहे, जिथे मंगळवारी एक असहाय बाप आपल्या मुलाच्या उपचारासाठी पोहोचला होता. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. लाख विनंत्या करूनही रूग्णवाहिकेची व्यवस्था रूग्णालय प्रशासनाकडून होत नसल्यामुळे गरीब आणि असहाय पित्याकडे आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

मुलाच्या मृत्यूनंतर पैशाअभावी असहाय बाप मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन घराकडे रवाना झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या असहाय बापाने आपल्या मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन एसआरएन हॉस्पिटल ते  करछना पोलीस स्टेशन हद्दीतील दिहा गावापर्यंत पोहोचला आणि यादरम्यान त्याने 25 किलोमीटरचा प्रवास केला. मुलाचा मृतदेह घेऊन जाताना वडील थकले की आई खांद्यावर घेऊन जायची.

माणसांची माणुसकी कशी नष्ट होत चालली आहे, याचेही ही घटना उदाहरण आहे. कारण असहाय्य वडील मुलाचा मृतदेह खांद्यावर घेऊन घरी जात असताना वाटेत कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. या असहाय्य कुटुंबाला वाटेत कोणत्याही प्रकारचा आधार मिळाला नाही. जमाव या असहाय आई-वडिलांकडे बघतच राहिला, पण तिच्या मुलाचा मृतदेह घरी नेण्याची तसदी कोणी घेतली नाही.

Web Title: Shame on humanity! The father walked 25 km carrying his son's body on his shoulder in Uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.