Video: ही लाजीरवाणी गोष्ट... मंत्र्याच्या मुलास धडा शिकवणाऱ्या महिला पोलिसावर राजीनाम्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 09:42 PM2020-07-12T21:42:53+5:302020-07-12T21:54:54+5:30
गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली.
सुरत - गुजरातमध्ये लॉकडाऊन काळात संचारबंदी असतानाही वडिलांची गाडी घेऊन बिनधास्त फिरणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या मुलास महिला पोलीस अधिकाऱ्याने चांगलाच धडा शिकवला. मात्र, या धाडसी कार्याबद्दल सुनिता यादव यांचे कौतुक करण्याऐवजी, त्यांना पुरस्कार देण्याऐवजी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत
ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलंय.
गुजरातच्या वरछा येथे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानाणी यांचा मुलगा प्रकाश आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनिता यादव यांच्यात चांगलीचा बाचाबाची झाली. राज्यमंत्र्यांच्या मुलाने वडिलांच्या पॉवरचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, लॉकडाऊन काळात वडिलांची नेमप्लेट असलेली गाडी घेऊन रस्त्यावर फिरत असल्यामुळे सुनिता यांनी त्यास चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर, थेट आरोग्यमंत्र्यांनाही सुनिता यांनी कायदा हा सर्वाना समान असल्याचे सांगत माझं कर्तव्य करत असल्याचे म्हटले. त्यामुळे, त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही लज्जास्पद घटना असल्याचे म्हटले.
गुजरात में मंत्री का बिगड़ैल बेटा कर्फ्यू का उल्लंघन कर बिना मास्क घूम रहा था, कांस्टेबल सुनीता यादव ने बिना किसी दबाव में आए अपनी ड्यूटी निभाई। इस कार्य के लिए उन्हें सम्मानित करना चाहिए था पर उन्हें पूरे प्रशासन के दबाव में इस्तीफा देना पड़ रहा है। शर्मनाक!#SunitaYadavpic.twitter.com/7BEYXykPAA
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) July 12, 2020
संचारबंदी असतानाही मास्क न वापरता कारमधून 5 युवकांसह जात असलेल्या प्रकाश आणि त्याच्या मित्रांना सुनिता यादव यांनी अडवले होते. त्यावेळी, प्रकाशने सुनिता यांना वर्षभर याच ठिकाणी ड्युटी लावेल, अशी धमकी दिली. त्यामुळे, संतापलेल्या महिला पोलीस कॉन्टेबल सुनिता यांनी प्रकाशला खडे बोल सुनवाले. पोलिसांची वर्दी तुझ्या बापाची गुलामगिरी करण्यासाठी घातली नाही, असा सज्जड दमच यादव यांनी दिला. अखेर वरिष्ठांशी फोन झाल्यानंतर मी राजीनामा देईन, असे सांगून सुनिता यांनी वाद मिटवला. सध्या सोशल मीडियावर सुनिता यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.