शानबाग यांचा गुन्हेगार सोहनलालला गावातून हाकलणार

By admin | Published: June 1, 2015 09:28 AM2015-06-01T09:28:58+5:302015-06-01T12:50:09+5:30

अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करून त्यांना आयुष्यभरासाठी कोमात ढकलणा-या क्रूर सोहनलाल वाल्मिकीला गावाबाहेर हाकण्याची मागमी गावक-यांनी केली आहे.

Shanbag's culprit is to be escaped from the village of Sohanlal | शानबाग यांचा गुन्हेगार सोहनलालला गावातून हाकलणार

शानबाग यांचा गुन्हेगार सोहनलालला गावातून हाकलणार

Next
ऑनलाइन लोकमत
पारपा (हापुड), दि. १ - के. ई. एम. रुग्णालयातील परिचारिका दिवंगत अरुणा शानबाग यांच्यावर अत्याचार करून त्यांना आयुष्यभरासाठी कोमात ढकलणा-या क्रूर सोहनलाल वाल्मिकीला गावाबाहेर हाकलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. असे क्रूर कृत्य करणारा वाल्मिकी आपल्या गावात नको अशी मागणी संतप्त गावक-यांनी पंचायतीकडे केल्याचे समजते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ उत्तर प्रदेशमधील पारपा गावात राहणारा हा सोहनलाल तोच आहे ज्याने अरूणावर अत्याचार केला हे मीडियाच्या माध्यमातून समजल्यानंतर गावकरी संतप्त झाले असून त्याला गावातून हाकलण्याची मोहिम उघडली आहे. 
 
१९७३ मध्ये सोहनलाल वाल्मिकीने अरुणा शानबाग यांच्यावर केलेल्या अत्याचारानंतर त्या कोमामध्ये गेल्या.  त्यांच्या मेंदूच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा खंडित झाला. यामुळे त्यांचे काही अवयव आणि संवेदना निकामी झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये  तब्बल ४२ वर्ष अशा अवस्थेत पडून राहिल्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या स्थितीला जबाबदार असणा-या सोहनलाल वाल्मिकीला काही वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा नव्हता. मात्र नुकताच एका वृत्तपत्राने त्यांचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील पारपा गावात रहात असल्याचे समोर आले. तुरूंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर मित्र, नातेवाईक यांनी वाल्मिकीशी संबंध तोडून टाकले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तो त्याच्या पत्नीच्याच गावी रहात आहे. तेथे तो मोलमजुरी करून पोट भरत आहे. मीडियाने त्याचा शोध लावताच सर्व गावकरी चक्रावले. अरूणा शानभाग यांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरलेला, इतके क्रूर कृत्य करणारा सोहनलाल गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्याच गावात रहात होता, हे लक्षात आल्यावर ते हादरले. त्याच्यामुळेच गावाचे नाव खराब झाल्याची भावना गावक-यांमध्ये असून वाल्मिकी व त्याच्या कुटुंबालाच गावातून हाकलण्याची मागणी गावक-यांनी केल्याची माहिती सरपंच जोगिंदर सिंग यांनी दिली. याप्रकरणी लवकरच पंचायतीची बैठक घेण्यात येणार असून त्यात वाल्मिकीचा फैसला करण्यात होईल. 
 
एकीकडे गावकरी त्याच्यावर संतापलेले असताना सोहनलालचे कुटुंबीय मात्र गावातून हाकललले जाण्याच्या भीतीने हादरले आहेत. शानबाग प्रकरणी पोलिसांनी सोहनलालला अकारण गोवल्याचा कांगावाही ते करत आहेत. तसेच या परिस्थितीसाठी ते मीडियालाही जबाबदार ठरवत आहेत. 'माझ्या सास-यांना त्यांच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले, त्यांनी त्यासाठी शिक्षाही भोगली. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ते शांतपणे जीवन जगत होते, पण मीडियाने या प्रकरणाला सनसनाटी वळण दिले असून त्यांना पुन्हा माझ्या सास-यांना जेलमध्ये पाठवयाचे आहे', अशी प्रतिक्रिया सोहनलालच्या उद्विग्न सुनेने दिली. 

 

Web Title: Shanbag's culprit is to be escaped from the village of Sohanlal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.