900 IAS ऑफिसर घडविणाऱ्या शंकर यांच्या आत्महत्येनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:14 PM2018-10-13T16:14:23+5:302018-10-13T16:19:14+5:30

तामिळनाडूमध्ये आयएएस अकॅडमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शंकर देवराजन यांनी 2004 मध्ये आयएएस अकॅडमीची सुरूवात केली होती.

Shankar' devrajan Suicide in home, who became 900 IAS officers | 900 IAS ऑफिसर घडविणाऱ्या शंकर यांच्या आत्महत्येनं खळबळ

900 IAS ऑफिसर घडविणाऱ्या शंकर यांच्या आत्महत्येनं खळबळ

googlenewsNext

चेन्नई - शंकर आयएएस अकॅडमीचे संस्थापक आणि सीईओ प्रा. शंकर देवराजन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. चेन्नईतील राहत्या घरी त्यांचे मृतदेह आढळून आला. शंकर यांनी वयाच्या 45 व्या वर्षीच फाशी घेऊन आत्महत्या केली. खासगी कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. शंकर देवराजन यांनी त्यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून आत्तापर्यंत देशाला 900 आयएएस अधिकारी दिले आहेत. 

तामिळनाडूमध्ये आयएएस अकॅडमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शंकर देवराजन यांनी 2004 मध्ये आयएएस अकॅडमीची सुरूवात केली होती. अल्पावधीतच शंकर यांची अकॅडमी नावारुपाला आली. आत्तापर्यंत त्यांच्या अकॅडमीतून देशाला जवळपास 900 पेक्षा अधिक आयएएस अधिकारी तयार झाले आहेत. त्यामुळे देशातील प्रशासकीय वर्तुळात आणि अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शंकर यांची आयएएस अकॅडमी ही राज्यातील पहिली अकॅडमी होती, ज्यांचे उद्दिष्ट हे आयएएस दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी शंकर यांचे त्यांच्या पत्नीसोबत भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका शेतकरी कुटुंबातून पुढे आल्याने शंकर यांच्या अकॅडमीत गरीब आणि होतकरू युवकांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत होतं. 
 

Web Title: Shankar' devrajan Suicide in home, who became 900 IAS officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.