शंकर महादेवन यांच्या हस्ते उद्या संगीत विद्यालयाचे उद्घाटन
By admin | Published: July 9, 2015 10:46 PM2015-07-09T22:46:53+5:302015-07-10T00:27:04+5:30
नाशिक : रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खास अंधांसाठी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आघाडीचे संगीतकार आणि पार्श्वगायक शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
नाशिक : रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खास अंधांसाठी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि.११) आघाडीचे संगीतकार आणि पार्श्वगायक शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशनद्वारा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात दुपारी ४ वाजता संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन होणार असून, या संगीत विद्यालयात प्राथमिक स्तरापासून ते अलंकार विशारदेपर्यंत अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने संगीताचे धडे गिरवता येणार आहे, तसेच या विद्यालयात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, सर्व प्रकारची चर्म वाद्ये, व्हायोलिन, मेंडोलिन यांसारखी दुर्मिळ वाद्येही शिकवली जाणार आहेत.
द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या अंधांसाठी काम करणार्या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, स्वयंरोजगारासाठी वस्तू उपलब्ध करून देणे, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, अंध व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, अंधांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आदि योजना राबविण्यात येतात.
दुपारी संगीत विद्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे शंकर महादेवन यांचा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून, या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून प्राप्त होणारा निधी संगीत विद्यालय आणि कॉम्प्युटर सेंटरच्या उभारणीसाठी वापरला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, खास लोकमत सखी मंच सदस्य आणि प्रिव्हिलेज कार्डधारकांना ५०० रुपयांचे तिकीट ४२५ रुपयांना, तर ३०० रुपयांचे तिकीट २२५ रुपयांना वितरित करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस द ब्लाइन्ड वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सचिव दत्ता पाटील, कोषाध्यक्ष विजया डबे, मानद अध्यक्ष कल्पना पांडे, डॉ. विजय घाडगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
-- सदरची बातमी श्री अग्रवालसोा यांना दाखवणे...