शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी

By admin | Published: March 29, 2016 02:45 AM2016-03-29T02:45:06+5:302016-03-29T02:45:06+5:30

लेखापाल राधाकृष्णन यांच्यावरील हल्ल्यासंबंधी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

Shankaracharya Jayendra Saraswati's attendance in court | शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी

शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची न्यायालयात हजेरी

Next

चेन्नई : लेखापाल राधाकृष्णन यांच्यावरील हल्ल्यासंबंधी माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयेंद्र सरस्वती तसेच कनिष्ठ सहकारी विजयेंद्र सरस्वती यांचे बंधू रघू, कांची मठाचे व्यवस्थापक सुरेंद्र अय्यर यांच्यासह आठ जणांनी प्रथम अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. राजामनीक्कम यांच्यासमक्ष हजेरी लावली.
सुमारे एक तास जाबजबाब देताना ८० वर्षीय जयेंद्र सरस्वती म्हणाले की, सर्व काही खोटे आणि चुकीचे आहे.
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे त्यांनी हात हलवत नाही अशी दिली. साक्षींदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ६० पानी प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यापैकी ९१ प्रश्नांची उत्तरे जयेंद्र सरस्वती यांनी दिली.
राधाकृष्णन यांच्यावर २० सप्टेंबर २००२ रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. जयेंद्र सरस्वती यांच्यासह १२ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदला होता. यामुळे हिंदू समाजात खळबळ उडाली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Shankaracharya Jayendra Saraswati's attendance in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.