"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 05:47 PM2024-10-21T17:47:57+5:302024-10-21T17:50:34+5:30

"जर आपल्याला काही चुकीचे वाटले तर आपण बोलू शकता. यात, भाजपविरोधी म्हणण्याने काय फरक पडणार? समजा आम्ही भाजपविरोधी आहोत."

shankracharya avimukteshwaranand saraswati Commented about maharashtra assembly election cow slaughtering and bjp | "भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?

"भाजप विरोधी होणे गुन्हा आहे का? आम्ही त्यालाच मतदान करणार जो..."; अविमुक्तेश्वरानंद महाराष्ट्रात कुणासोबत?

उत्तराखंडमधील जोशीमठ येथील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे विधान केले आहे. जो गायीच्या बाजूने उभा आहे त्यालाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसेच, आपण गोहत्येच्या विरोधात आहोत आणि जो कुणी गायीसाठी उभा असेल त्याला पाठिंबा देऊ, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक प्रश्न विचारला असता, शंकराचार्य म्हणाले, "मुंबईत गायींच्या सन्मानासाठी एका कार्यक्रमात आपण म्हणालो आहोत की, जो गायीसाठी उभा आहे तो आमचा आहे. त्याला मत द्या. आम्हाला कसलाही संकोच नाही. जे गायीचे मारेकरी आहेत, त्यांना आम्ही न डगमगता कसाई म्हणत आहोत आणि जे गायींसाठी उभे राहिलेले दिसतात त्यांना आम्ही भाऊ म्हणतो. कसलाही संकोच न बाळगता. आम्ही पक्ष पाहत नाही, गायीसाठी कोण उभे आहे ते पाहत आहोत.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले, "जो कुणी शपथ घेण्यापूर्वी गायीसाठी उद्घोष करेल, त्यालाच आम्ही मतदना करणार. जर त्यांनी शपथ घेण्यापूर्वी गायीसाठी केलेला उद्घोषणा तोडला, तर आम्ही गौहत्येच्या ओझ्याखालून मुक्त राहू. कारण, आता आमचे समर्थन असणारा पक्ष विजयी झाला, तर आम्हीही आम्हीही त्याचे भागीदार होऊ."

"भाजप विरोधी होणे दोष आहे का? भाजप विरोधी तर काँग्रेस आहे. काँग्रेसच्या नेत्याला तर आपण मंत्री पदाचा दर्जा दिला आहे. विरोधीपक्षनेता बनवले आहे. त्यांना बोलायलाही वेळ दिला जातो. काँग्रेसी होणे गुन्हा आहे, भाजपचे होणे गुन्ह आहे, भाजप विरोधी असणे गुन्ह आहे? भाजप शिवाय किती पक्ष आहेत, जे INDIA चा भाग झाले. ते सर्व भाजपला विरध करतात. त्यामुळे भाजपचा विरोध करणे काही दोष थोडी आहे. अरे जर काही गडबड असेल तर, कुणीही बोलेलच. भारताच्या लोकशाहीने अधिकार दिला आहे.

"जर आपल्याला काही चुकीचे वाटले तर आपण बोलू शकता. यात, भाजपविरोधी म्हणण्याने काय फरक पडणार? समजा आम्ही भाजपविरोधी आहोत." शंकराचार्य म्हणाले, "जर भाजपचे काही चुकले आणि आम्ही त्याला विरोध केला तर काय चुकले. आम्ही पंतप्रधानांचाही पूर्ण विरोध करत नाहीत. त्यांचे जे चांगले काम आहे त्याचे आम्ही कौतुक करतो. आम्ही गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यासाठी काँग्रेस विरोधातही आंदोलन केले आहे," असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
 

Web Title: shankracharya avimukteshwaranand saraswati Commented about maharashtra assembly election cow slaughtering and bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.