पतीचा अपघातात मृत्यू, घरची परिस्थिती बेताची पण 'ती' खचली नाही; एकटीने सांभाळला व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 05:10 PM2023-03-07T17:10:47+5:302023-03-07T17:13:02+5:30
पतीच्या निधनानंतर शांतीवर दु:खाचा डोंगर कोसळला, पण तरीही तिने जीवनात हार न मानता त्याच हिमतीने पुढे वाटचाल केली.
एका महिलेने इतरांसाठी प्रेरणादायी काम केले आहे. पतीच्या निधनानंतर शांतीवर दु:खाचा डोंगर कोसळला, पण तरीही तिने जीवनात हार न मानता त्याच हिमतीने पुढे वाटचाल केली. त्यानंतर तिने आपले ध्येय गाठले आणि आज ती इतर महिलांनाही प्रेरणा देत आहे. 59 वर्षीय शांती मौर्य सतनापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मैहरच्या ओइला गावात राहतात.
25 ऑक्टोबर 2016 रोजी शांती यांचे पती राजेंद्र मौर्य यांचा अपघातात मृत्यू झाला. पतीचे छोटेसे दुकान होते. शांती य़ांचा नवरा छोट्या तलावात मत्स्यशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मात्र त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांती मौर्य यांच्यावर आली. त्यांचा मुलगा बाहेर शिकत होता. शांती य़ांनी मुलाचं शिक्षण थांबू दिलं नाही, त्याचे शिक्षण पूर्ण केले. आज तोच मुलगा त्याला त्याच्या कामात मदत करतोय.
पोल्ट्री फार्म, भाजीपाला शेतीही केली
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही शांती य़ांनी हार मानली नाही. पतीच्या निधनानंतर त्यांनी स्वत: मत्स्यपालनाचे काम सांभाळले. यासोबतच शांती यांनी आपल्या घरात एक छोटा पोल्ट्री फार्मही सुरू केला. तसेच घरामागील मोकळ्या जागेवर भाजीपाल्याची लागवड केली. पोल्ट्री फार्ममधील कचरा भाजीपाल्याच्या शेतात खत म्हणून वापरण्यास सुरुवात केली. शांती यांनी आयुष्यात कोणाच्याही समोर गुडघे टेकले नाहीत आणि यश मिळवण्यासाठी एकट्याने संघर्ष केला, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने केलं सहकार्य
मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसंचालक अनिल श्रीवास्तव म्हणाले की, शांती मौर्य हे महिला सक्षमीकरणाचे मोठे उदाहरण आहे. छोट्या तलावातून मासेमारी सुरू केली. पतीच्या निधनानंतर शांती सतत काम करत आहे. शांती यांनी आता नवीन प्लांट कल्चर सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. सतना जिल्ह्यातील महिलांसाठी हे अनोखे उदाहरण असून मत्स्य विभागाचे कौतुक होत आहे. त्यांना विभागाकडून सहकार्यही केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"