तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने केले निलंबित
By admin | Published: April 19, 2017 01:20 PM2017-04-19T13:20:38+5:302017-04-19T13:29:08+5:30
बीएसएफचे जवान तेज बहाद्दुर यांना बीएसएफने सेवेतून निलंबित केल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सीमेवर तैनात जवानांना मिळणा-या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणा-या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून निलंबित केल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केली म्हणून ही कारवाई केल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले.
तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली.
तेज बहाद्दुर यांना मनोरुग्ण ठरवण्याचाही प्रयत्न झाला. भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याबद्दल का त्रास दिला जातोय असा सवालही तेज बहाद्दुरने पंतप्रधान मोदी यांना केला होता.