Nitish Kumar, INDIA Alliance: नितीश कुमारांना 'इंडिया' आघाडीकडून उपपंतप्रधान पदाची ऑफर? सत्ताबदल होण्याची चिन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:40 PM2024-06-04T16:40:49+5:302024-06-04T16:45:32+5:30

Nitish Kumar India Alliance, Lok Sabha Election Result 2024: याआधी नितीश कुमार यांनी दोन वेळा राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी अचानक मित्रपक्षाची साथ सोडली होती

Sharad Pawar calls Nitish Kumar INDIA Alliance gives vice prime minister post offer amid Lok Sabha Election 2024 | Nitish Kumar, INDIA Alliance: नितीश कुमारांना 'इंडिया' आघाडीकडून उपपंतप्रधान पदाची ऑफर? सत्ताबदल होण्याची चिन्हे?

Nitish Kumar, INDIA Alliance: नितीश कुमारांना 'इंडिया' आघाडीकडून उपपंतप्रधान पदाची ऑफर? सत्ताबदल होण्याची चिन्हे?

Nitish Kumar INDIA Alliance, Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू येऊ लागले आहेत. निवडणुकीचे निकाल आणि कल यांच्यात भाजपप्रणित एनडीए जरी पुढे असली तरी विरोधकांच्या इंडिया आघाडीने अपेक्षेपेक्षा अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. दुपारी हाती आलेल्या कलांच्या आधारवर भाजपाला २५०चा आकडा गाठता आला नव्हता. तर, NDA लादेखील कशीबशी २९९ जागांवर आघाडी घेता आली होती. एनडीए मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूच्या १४ जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तशातच, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया अलायन्सने नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. जेडीयूकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आणि जेडीयू एनडीएचाच भाग राहिल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, शरद पवार यांनीदेखील पत्रकार परिषद घेत आपण कोणाशीही फोनवर संपर्क केलेला नाही असे स्पष्ट केले. पण काही सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि नितीश कुमार हे दोघेही कसलेले राजकारणी आहेत. त्यामुळे हे दोनही नेते मनात काय सुरु आहे याचा ताकास तूर लागू देणार नाही, असे बोलले जात आहे.

चर्चा रंगल्याचे कारण काय?

जेव्हा नितीश कुमार बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार चालवत होते आणि काँग्रेसशिवाय आरजेडीही त्यांच्यासोबत होते, तेव्हा नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी बैठका सुरू केल्या होत्या, पण नंतर त्यांनी महाआघाडी सोडली. एवढेच नाही तर महाआघाडी सोडल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून एनडीएत सहभाग घेतला होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूप मोठी असल्याने त्यांच्याबाबत अशा चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Web Title: Sharad Pawar calls Nitish Kumar INDIA Alliance gives vice prime minister post offer amid Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.