शरद पवार आज शहरात

By admin | Published: June 20, 2016 12:20 AM2016-06-20T00:20:59+5:302016-06-20T00:20:59+5:30

जळगाव- माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम विद्यार्थी भवन व उत्तमविद्या नगरी कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जळगावात येत आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे.

Sharad Pawar in the city today | शरद पवार आज शहरात

शरद पवार आज शहरात

Next
गाव- माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम विद्यार्थी भवन व उत्तमविद्या नगरी कर्मचारी वसाहतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जळगावात येत आहेत. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे.
रामदास आठवले आज शहरात
जळगाव- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिर २० रोजी जळगावात होणार आहे. या शिबिरासाठी खासदार रामदास आठवले शहरात येत आहेत. काव्यरत्नावली चौकातील हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी हे शिबिर होणार आहे.
गुणवंतांना आवाहन
जळगाव- आदिवासी पारधी महासंघातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० वी ते पदव्युत्तरचे शिक्षण घेणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणपत्रक, छायाचित्र उखर्डू साळुंके, बाबूलाल गवांदे यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण यांनी केले आहे.
मागण्यांसाठी आंदोलन
जळगाव- अंगणवाडी कर्मचार्‍यांना मार्च २०१६ पासूनचे थकीत मानधन मिळावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे २० जूनला प्रकल्प कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माया परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील यांनी दिली आहे.
योग दिनानिमित्त शिबिर
जळगाव- ब्रšााकुमारीज सेंटर, म्हसावद (ता.जळगाव) येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १९ ते २१ जून दरम्यान प्राणायाम, योगासने व मेडिटेशन शिबिर आयोजित केले आहे. १९ रोजी सकाळी ५ ते ७ या वेळेत प्रा.अविनाश कुमावत, राजबहन, योजना दिदी यांनी मार्गदर्शन केले. सरपंच विमल चिंचोरे, विमल वाणी, कैलास चव्हाण, अरूण चव्हाण, साहेबराव पाटील उपस्थित होते.
योजनेच्या लाभात वाढ
जळगाव- जिल्‘ातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसह ५ हजारांचे बांधकाम साहित्य खरेदीसाठी भेट व कल्याणकारी मंडळाच्या योजनेच्या लाभात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. १८ जूनला मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत हे निर्णय घेण्यात आले. राज्य बांधकाम कामगार समन्वयक समितीतर्फे नरसय्या आडम, डॉ.डी.एल. कराड, सीताराम ठोंबरे, भरमा कांबळे यांनी चर्चेत भाग घेतला.

Web Title: Sharad Pawar in the city today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.