जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल, तेव्हा...; दिल्लीतून शरद पवारांचं लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 05:15 PM2024-03-31T17:15:58+5:302024-03-31T17:17:10+5:30

Loksabha Election 2024: इंडिया आघाडीकडून दिल्लीत लोकशाही बचाओ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीतून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह देशातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. 

Sharad Pawar criticized the ruling BJP in a Delhi rally against Arvind Kejriwal's arrest | जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल, तेव्हा...; दिल्लीतून शरद पवारांचं लोकांना आवाहन

जेव्हा तुम्ही मतदान केंद्रात जाल, तेव्हा...; दिल्लीतून शरद पवारांचं लोकांना आवाहन

नवी दिल्ली - Sharad Pawar on BJP ( Marathi News ) देशात निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे मत भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांविरोधात द्या असं आवाहन करत दिल्लीच्या रामलीला मैदानातून शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. 

शरद पवार म्हणाले की, आज केजरीवालांवर हल्ला झाला, त्यांना जेलला पाठवले. याआधी झारखंडचे मुख्यमंत्री त्यांनाही जेलमध्ये पाठवले. दिल्ली असो, महाराष्ट्र असो वा पश्चिम बंगालचे राजकीय नेते, आमदार, लोकसभा सदस्य विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम हे सरकार करत आहे. ही कारवाई संविधान आणि लोकशाहीवरील हल्ला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले त्यावर जर हल्ला होत असेल, लोकशाही धोक्यात असेल तर प्रत्येक भारतीयाची जबाबदारी त्याला वाचवण्याची आहे. आम्ही हे पाऊल उचलले आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दिल्ली, झारखंडचे मुख्यमंत्री यांच्यावर ज्यारितीने कारवाई झाली ती पाहता भाजपा सरकारने लोकशाही आणि देशाच्या संविधानावर एक मोठा प्रहार केला आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधान वाचवण्यासाठी ज्या राजकीय शक्ती आहेत भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबत विचार करण्याची वेळ आता आलीय. देशाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्यांना देशातील जनता योग्य मार्गावर कसं आणते याचे चांगले उदाहरण तुम्ही देऊ शकता असंही शरद पवारांनी जनतेला सांगितले. 

'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल'

हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, आम्ही याच हुकूमशाहीविरुद्ध लढत आहोत. कल्पना जी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या दोन बहिणी हिंमतीने लढत असतील, तर आम्ही सगळे भाऊ मागे कसे राहणार. आपल्याला एक संमिश्र सरकार आणवे लागेल, हे संमिश्र सरकारच देशाला वाचवू शकते. भ्रष्टाचार करणारे लोक भाजपामध्ये आणि ह्यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना आरोपी करुन तुरुंगात टाकले अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. 
 

Web Title: Sharad Pawar criticized the ruling BJP in a Delhi rally against Arvind Kejriwal's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.