Sharad Pawar: अतिउत्साहात तत्वांचा बळी नको!; सहकार कायद्यातील विसंगतीवरुन पवारांचं मोदींना सविस्तर पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:35 PM2021-07-17T17:35:09+5:302021-07-17T17:38:35+5:30
Sharad Pawar letter To PM Narendra Modi: सहकार क्षेत्राशी संबंधित अधिनियमातील मुलभूत तरतुदींमध्ये विसंगती असल्याचं पवार यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं आहे.
Sharad Pawar letter To PM Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आज सकाळी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. जवळपास तासभराहून अधिक काळ झालेल्या या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये सहकार क्षेत्रातील बदलांवरुन सविस्तर चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. कारण सहकार क्षेत्रातील बदलांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेलं पत्र शरद पवार यांनी आता समाजमाध्यमांत प्रसिद्ध केलं आहे. पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राची प्रत ट्विट केली आहे. (Sharad Pawar Meet Narendra Modi and gave memorandum regarding recent developments in Cooperative sector)
पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती
सहकार क्षेत्राशी संबंधित अधिनियमातील मुलभूत तरतुदींमध्ये विसंगती असल्याचं पवार यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं आहे. सहकारसंदर्भातील नवे नियम कायदेशीररित्या अकार्यक्षम असून या क्षेत्रातील तत्वांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे सुधारित कायदा अंमलात आणताना घटनेत नमूद असलेल्या सहकारी तत्वांचा अतिउत्साही नियमांच्या बळावर बळी तर जात नाहीय ना याची काळजी घ्यायला हवी, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?
I wish to point out certain inconsistencies and the resulting legal inefficacy of normative provisions of the Act that are in conflict most specifically with the 97th Constitutional Amendment, State Co-operative Societies Acts and with the Co-operative Principles. pic.twitter.com/bUGpY2rnTY
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता सहकार क्षेत्रासाठीचं नवं मंत्रालय निर्माण करण्यात आलं आहे. या मंत्रालयाची जबाबदारी देशाचे केंद्रीय गृहमंत्रि अमित शाह यांच्याकडे देण्यात आला आहे. या नव्या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर राज्यात सहकार क्षेत्रासंदर्भातून नवनवीन चर्चांना उधाण आलं आहे. याच सहकार धोरणांबाबत शरद पवार यांनी भलंमोठं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. आजच्या भेटीत त्यांनी हे पत्र मोदींना दिलं आहे.