Sharad Pawar: शरद पवार-अमित शहा भेटीचा खुलासा, जाणून घ्या कशावर झडली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:59 PM2021-08-03T18:59:00+5:302021-08-03T19:07:48+5:30

Sharad Pawar: अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत झाली.

Sharad Pawar: Sharad Pawar-Amit Shah meeting revealed, find out what the discussion was about | Sharad Pawar: शरद पवार-अमित शहा भेटीचा खुलासा, जाणून घ्या कशावर झडली चर्चा

Sharad Pawar: शरद पवार-अमित शहा भेटीचा खुलासा, जाणून घ्या कशावर झडली चर्चा

Next
ठळक मुद्देआम्ही निदर्शनास आणून दिलेल्या अडचणींचा सहकारमंत्री विचार करतील आणि त्या सोडवतील, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, या बैठकीत सहकारमंत्र्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी सरकार घेरण्यासाठी काँग्रेससह १४ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा(Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच या भेटीचा खुलासा केला आहे. 

अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहा-पवार भेटीत नेमकं काय घडलं आणि त्याचा भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगणं आत्ता कठीण आहे. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच भेटीचं स्पष्टीकरण दिलंय.
सुरुवातीला मी देशाचे पहिले सहकारमंत्री नियुक्त झाल्याबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहांचे अभिनंदन केले. त्यानंतर, या बैठकीत साखर उत्पादनासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाली. देशातील सद्यस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही चर्चा झाली. साखरेचा एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी, यांसारख्या दोन गंभीर समस्याही आम्ही नव्या सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. 


आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या अडचणींचा सहकारमंत्री विचार करतील आणि त्या सोडवतील, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, या बैठकीत सहकारमंत्र्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे. या बैठकीला, सहकारी जयप्रकाश दांडेगावकर NFCSF (नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड) चे अध्यक्ष आणि साखर सहकारी संघाचे प्रकाश नाईकनवरे व खासदार सुनिल तटकरे हेही उपस्थित होते. 
 

Web Title: Sharad Pawar: Sharad Pawar-Amit Shah meeting revealed, find out what the discussion was about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.